Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व

Smriti Mandhana: स्मृती मांधाना याआधी भारताचे उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळत होती. मात्र भारतीय महिला क्रिकेटमधील तिचे योगदान पाहून बीसीसीआयने तिच्यावर नवीन जबाबदारी सोपवली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2026 | 02:09 PM
Smriti Mandhana

Smriti Mandhana

Follow Us
Follow Us:
  • हरमनप्रीत कौरने दिला होता राजीनामा 
  • स्मृती मंधाना असणार भारताची नवी कर्णधार 
  • बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा 
Smriti Mandhana/Team India New Captain: भारताची माजी कर्णधार हरमनप्रीत कौरने काल तीनही फॉर्मटमधील पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भारतीय महिला संघाचे नेतृत्व कोण करणार अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर बीसीसीआयने टीम इंडियाची कमान स्मृती मंधानाकडे सोपविली आहे. स्मृती आता तीनही फॉर्मटमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. याआधीही स्मृतीने वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले होते.

स्मृती मांधाना याआधी भारताचे उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळत होती. मात्र भारतीय महिला क्रिकेटमधील तिचे योगदान पाहून बीसीसीआयने तिच्यावर नवीन जबाबदारी सोपवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, स्मृतीने डोमेस्टिक  फ्रँचायझी क्रिकेटमध्येही आपली प्रभावी नेतृत्वक्षमता सिद्ध केली आहे. तिच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमियर लीगचे 2024 चे विजेतेपद जिंकले होते.’

हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?

मंगळवारी जारी केलेल्या अधिकृत पत्रकात बीसीसीआयने म्हटले, ‘ती २०१३ पासून भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या नव्या जबाबदारीसाठी तिच्याकडे प्रचंड अनुभव आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आता एका नव्या युगात प्रवेश करत असून, गेल्या काही वर्षांत झालेल्या प्रगतीला अधिक उंचीवर नेण्याची आणि संघाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता स्मृतीवर असणार आहे.’

काय म्हणाली स्मृती मांधाना?

भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी खूप मोठा आणि खास सन्मान आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी नेहमीच अत्यंत मोलाची गोष्ट राहिली आहे आणि आता संघाचे नेतृत्व करण्याचा मिळालेला हा सन्मान देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी निवड समिती, संघातील सर्व सहकारी खेळाडू आणि मला सतत पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाची अत्यंत आभारी आहे.’

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मंगळवारी सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आढावा बैठकीच्या अवघ्या एका दिवसानंतर हरमनप्रीतने हा निर्णय घेतल्याने क्रिकेट जगतात मोठा खळबळ उडाली होती.  हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानली जाते. तिच्याच नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने गेल्या वर्षी पहिल्यांदाच ऐतिहासिक ‘महिला वनडे वर्ल्ड कप’चे विजेतेपद पटकावून इतिहास रचला होता.

Web Title: Bcci appointed smriti mandhana as new captain of womesn team india breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • bcci
  • Indian Women Cricket Team
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
1

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?
2

हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
3

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर
4

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.