Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वयाशी संबंधित फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2026 | 02:36 PM
bcci ban 64 players

bcci ban 64 players

Follow Us
Follow Us:
  • बीसीसीआयकडून 64 खेळाडूंवर बंदी
  • रोहित यादवच्या वयोमर्यादेवरून घमासान 
  • वर्ल्डकप टीमच्या एका खेळाडूचा समावेश 
BCCI Breaking: बीसीसीआय ही भारतीय क्रिकेटशी संबंधित एक महत्वाची संस्था आहे. भारतीय संघाची निवड आणि अन्य सर्व महत्वाच्या गोष्टींमध्ये बीसीसीआय महत्वाची भूमिका बजावत असते. मात्र आता या संस्थेने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वय लपवून फसवणूक करणाऱ्या खेळाडूंवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. वय चोरीच्या प्रकरणात बीसीसीआयने एकाच वेळी ६४ खेळाडूंवर दोन वर्षांची कडक बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने आगामी हंगामासाठी आपल्या खेळाडूंची कागदपत्रे तपासण्यासाठी विशेष प्री-सीजन पडताळणी मोहीम राबवली होती. या प्रक्रियेत खेळाडूंनी दिलेल्या जन्मदाखल्यांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आणि फेरफार असल्याचे आढळून आले. त्यानंतर बीसीसीआयने मोठी कारवाई केली आहे.

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

२०२२ च्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज रवी कुमार याचा या बंदी घातलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. त्याच्या या कारवाईमुळे क्रिकेट वर्तुळात मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी नुकतीच भारतीय अंडर-१९ संघात निवड झालेल्या रोहित यादव या लेग स्पिनरचाही या यादीत समावेश आहे. बीसीसीआयच्या कठोर धोरणानुसार, या सर्व ६४ खेळाडूंवर २ वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. या कालावधीत हे खेळाडू बीसीसीआय किंवा कोणत्याही राज्य क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या अधिकृत स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वयाशी संबंधित फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्री-सीजन कागदपत्र पडताळणी दरम्यान लेग स्पिनर रोहित यादव याने वयाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाईनंतर रोहितची ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्धच्या आगामी मालिकेतून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे.

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

सीएबीच्या तपासणी अहवालात रोहित यादव याच्या वयात २७ महिन्यांची मोठी तफावत आणि फेरफार आढळून आली आहे. बीसीसीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेत रोहित यादववर बंदीची कारवाई केली आहे. मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व राज्य क्रिकेट संघटनांना या निर्णयाची अधिकृत माहिती देण्यात आली असून ही बंदी तात्काळ लागू करण्यात आली आहे. कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि योग्य वयाच्या खेळाडूंवर अन्याय होऊ नये यासाठी बीसीसीआय अशा प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घेताना दिसून येत आहे.

 

Web Title: Bcci ban 64 cricketers for 2 years rohit yadav and ravi kumar under 19 world cup breaking cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • bcci
  • BCCI India
  • cricket news

संबंधित बातम्या

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
1

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
2

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला
3

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?
4

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.