बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी 70 वर्षांचे झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार, कोणत्याही पदाधिकाऱ्याला 70 वर्षांपेक्षा जास्त वय होईपर्यंत पदावर राहता येत नाही. बिन्नी यांच्या राजीनाम्यानंतर, महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendular) हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होणार असल्याच्या अटकळांना उधाण आले होते. मात्र, आता त्यांच्या टीमने एक निवेदन जारी करून या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
सचिन रमेश तेंडुलकर (SRT) स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, “आमच्या निदर्शनास आले आहे की, सचिन तेंडुलकर यांचे नाव भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या अध्यक्षपदासाठी विचारात घेतले जात आहे किंवा त्यांना नामांकन दिले जात आहे, अशा काही अफवा पसरत आहेत. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की असे काहीही घडलेले नाही.” या निवेदनात सर्व संबंधितांना या निराधार अटकळांवर लक्ष न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
SRT Sports Management confirms that the rumours about Sachin Tendulkar becoming the next BCCI President are fake. ❌#Cricket #BCCI #Sachin #Sportskeeda pic.twitter.com/AWTdSi3oqX
— Sportskeeda (@Sportskeeda) September 11, 2025
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डची वार्षिक सर्वसाधारण बैठक 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत नवीन बीसीसीआय अध्यक्ष आणि आयपीएल अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. आयपीएलचे सध्याचे अध्यक्ष अरुण कुमार धूमल यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना ‘कूल-ऑफ’ कालावधीत जावे लागेल. दुसरीकडे, सध्याचे सचिव देवजित सैकिया, सहसचिव रोहन गौंस देसाई आणि कोषाध्यक्ष प्रभतेज सिंग भाटी हे आपापल्या पदांवर कायम राहण्याची शक्यता आहे. राजीव शुक्ला हे सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत आणि ते कोणत्याही ना कोणत्याही भूमिकेत बीसीसीआयशी जोडलेले राहतील अशी पूर्ण शक्यता आहे.
हे देखील वाचा: BCCI च्या बँक बॅलन्समध्ये किती पैसे आहेत? आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का! 5 वर्षात 14000 कोटी…वाचा सविस्तर
सचिन तेंडुलकरची गणना क्रिकेटच्या जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे. कसोटीमध्ये त्यांच्या नावावर १५,९२१ धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८,४२६ धावा जमा आहेत.