Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI कडून अरुणाचल प्रदेशच्या क्रिकेट संघांसाठी निवड चाचण्या; रणजीसह विविध स्पर्धांत खेळण्याचा मार्ग मोकळा होणार?

BCCI : अरुणाचल प्रदेशच्या विविध पुरुष आणि महिला वयोगटांतील तसेच वरिष्ठ क्रिकेट संघांच्या निवडीसाठी BCCI ने निवड चाचण्यांचे आयोजन केले आहे. चालू देशांतर्गत क्रिकेट हंगामातील स्पर्धांमध्ये अरुणाचल प्रदेशचे संघ सहभागी होऊ शकतील, या उद्देशाने BCCIने हे पाऊल उचलले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 13, 2026 | 02:20 PM
BCCI कडून अरुणाचल प्रदेशच्या क्रिकेट संघांसाठी निवड चाचण्या; रणजीसह विविध स्पर्धांत खेळण्याचा मार्ग मोकळा होणार?

BCCI कडून अरुणाचल प्रदेशच्या क्रिकेट संघांसाठी निवड चाचण्या; रणजीसह विविध स्पर्धांत खेळण्याचा मार्ग मोकळा होणार?

Follow Us
Follow Us:
  • संघांना स्पर्धांपासून दूर ठेवता येणार नाही
  • स्वतंत्र निवडकर्त्यांवर जबाबदारी
  • इटानगरमध्ये निवड चाचण्यांना सुरुवात
 

अरुणाचल प्रदेशच्या विविध पुरुष आणि महिला वयोगटांतील तसेच वरिष्ठ क्रिकेट संघांच्या निवडीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) निवड चाचण्यांचे आयोजन केले आहे. चालू देशांतर्गत क्रिकेट हंगामातील स्पर्धांमध्ये अरुणाचल प्रदेशचे संघ सहभागी होऊ शकतील, या उद्देशाने BCCIने हे पाऊल उचलले आहे.

अरुणाचल प्रदेशने अहमदाबाद येथे नागालँडविरुद्धचा पहिला रणजी करंडक सामना खेळला नव्हता. यापूर्वी विनू मांकड करंडक आणि १९ वर्षांखालील महिला टी-20 करंडक स्पर्धांमध्येही राज्याचा संघ सहभागी झाला नव्हता. अरुणाचल क्रिकेट असोसिएशनच्या (ACA) दोन गटांमधील वादामुळे हा पेच निर्माण झाला होता. यासंदर्भातील कायदेशीर अडचण गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या इटानगर खंडपीठात सुरू आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मंगळवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना अरुणाचल प्रदेशमध्ये निवड चाचण्या सुरू असल्याची माहिती दिली. बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेचे सदस्य एम. खैरुल जमाल मजुमदार यांची या चाचण्यांसाठी संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संघांना स्पर्धांपासून दूर ठेवता येणार नाही

सैकिया म्हणाले की, राज्याबाहेरील काही स्वतंत्र निवडकर्त्यांच्या मदतीने अरुणाचल प्रदेशमध्ये निवड चाचण्या घेतल्या जात आहेत. या प्रक्रियेत राज्य क्रिकेट संघटना सहभागी नाही. बीसीसीआय स्वतः या चाचण्या घेत असून, आगामी रणजी करंडक आणि अन्य देशांतर्गत स्पर्धांमध्ये अरुणाचल प्रदेशचे संघ उतरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे मानकरी

स्वतंत्र निवडकर्त्यांवर जबाबदारी

आसाममधील स्वतंत्र निवडकर्त्यांच्या पथकाला खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या पथकात माजी खेळाडू सत्य गोपाल चक्रवर्ती, जयंत चौधरी आणि दीप बोरा यांचा समावेश आहे. चक्रवर्ती हे निवडकर्त्यांच्या पथकाचे अध्यक्ष आहेत.

रणजी करंडक, कर्नल सी. के. नायडू करंडक, वरिष्ठ महिला टी-२० करंडक आणि विजय मर्चंट करंडक या स्पर्धांमध्ये अरुणाचल प्रदेशचे संघ सहभागी होतील, याची खात्री करण्याचे काम या पथकाला देण्यात आले आहे.

Cricket: अनुष्का वाईकरची अष्टपैलू कामगिरी; डिलीजंट क्रिकेट क्लबने स्पर्धेत उघडले विजयाचे खाते!

इटानगरमध्ये निवड चाचण्यांना सुरुवात

अरुणाचल प्रदेशातील एका स्थानिक सूत्राने इटानगरमध्ये निवड चाचण्या सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून इटानगर येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी या चाचण्या घेण्यात आल्या.

वरिष्ठ महिला संघ, पुरुषांचा १६ वर्षांखालील संघ, २३ वर्षांखालील संघ आणि वरिष्ठ पुरुष संघ निवडण्यासाठी या चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत.

Web Title: Bcci selection trials arunachal pradesh cricket teams rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Arunachal pradesh
  • bcci

संबंधित बातम्या

Ranji Trophy 2026-27:रणजी ट्रॉफीत मोठा ड्रामा! मैदानाऐवजी कोर्टात लढाई; अरुणाचल प्रदेश पहिल्याच सामन्याला मुकला, नेमकं प्रकरण काय?
1

Ranji Trophy 2026-27:रणजी ट्रॉफीत मोठा ड्रामा! मैदानाऐवजी कोर्टात लढाई; अरुणाचल प्रदेश पहिल्याच सामन्याला मुकला, नेमकं प्रकरण काय?

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा
2

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर
3

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
4

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.