
बेल्फिन्सचा जोग कॉमेट्सवर ५-२ असा सहज विजय
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील वरिष्ठ गटाच्या ब गटात बेल्फिन्स टायगर्सने जोग कॉमेट्स संघाचा ५-२ असा सहज पराभव केला. मिहिर विंझे, तन्मय चोभे, इशान लागू, प्रीती सप्रे, कर्णा मेहता, यश मेहेंदळे, अभिषेक ताम्हाणे, तनिश बेलगलकर, निखिल चितळे आणि नेहा लागू यांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर बेल्फिन्स टायगर्सने सामन्यावर वर्चस्व राखत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला.
Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय
याच गटातील दुसऱ्या सामन्यात हॉक्स संघाने कारा इंटलेक्ट कियाज संघावर ४-३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. हॉक्सच्या विजयात अनिश राणे, कृष्णनील गोरे, अभिजीत खानविलकर, अनुज मेहता, आनंद शहा, सिद्धांत खिंवसरा, जनक वाकणकर आणि राधिका इंगळहळीकर यांनी मोलाची कामगिरी बजावली. दरम्यान, अ गटात नाडगोंडे रेव्हन्सने आपली विजयी मालिका कायम ठेवत वन लिटिल फार्म सनबर्ड्स संघाचा ५-२ असा पराभव केला. प्रतीक धर्माधिकारी, केदार नाडगोंडे, समीर सावला, विश्वास मोकाशी, आशय कश्यप, चिन्मय चिरपुटकर, अविनाश दोशी, पृथ्वी शहा, रिआन करंदीकर आणि सारा नवरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत नाडगोंडे रेव्हन्सला सलग तिसरा विजय मिळवून दिला.
अ गटातील आणखी एका सामन्यात सेइनुमेरो रॉकेट्सने इम्पेरिअल स्वान्स संघाचा ५-२ असा पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. सेइनुमेरो रॉकेट्सकडून अनिकेत सहस्त्रबुद्धे, वरूण साहू, दिप्ती सरदेसाई, समीर जालान, नीलाश केळकर, हेमंत पाळंदे, क्षितिज कोतवाल, वेदांत खटोड, संस्कृती जोशी आणि सोहम जोशी यांनी प्रभावी कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.साखळी फेरीतील या निकालांमुळे नाडगोंडे रेव्हन्स आणि बेल्फिन्स टायगर्स यांनी आपापल्या गटातील आगेकूच मजबूत केली असून, आगामी सामन्यांमध्ये गुणतालिकेतील स्थानासाठी चुरस अधिक रंगण्याची चिन्हे आहेत.