पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धा
दुसऱ्या सामन्यात नीरज दांडेकर, प्रीती फडके, सचिन जोशी, सुमित नेरकर, वरूण निवर्गी, सारंग आठवले, अनिरुद्ध आपटे, अन्वित राजवाडे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर फाल्कन ऑप्टीमा संघाने कारा इंटलेक्ट कियाज संघाचा ४-३ असा पराभव करून पहिला विजय मिळवला. अ गटात नाडगोंडे रेव्हन्स संघाने सेइनुमेरो रॉकेट्स संघाचा ४-३ असा पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. विजयी संघाकडून प्रतीक धर्माधिकारी, केदार नाडगोंडे, अविनाश दोशी, चंद्रशेखर आपटे, चिन्मय चिरपुटकर, पृथ्वी शहा, रिआन करंदीकर, सारा नवरे यांनी सुरेख खेळी केली.
अन्य लढतीत एरियल स्विफ्टस संघाने इम्पेरिअल स्वान्स संघाचा ४-३ असा पराभव केला. एरियल स्विफ्टस संघाकडून सोहम कांगो, अमित देवधर, सिद्धार्थ साठ्ये, हेमंत करमरकर, तुषार नगरकर, रोहन जोशी, सोहम गाडगीळ, रोहीन लागू यांनी अफलातून खेळी केली.
जोग कॉमेट्स वि.वि. हॉक्स ४-३
(सुवर्ण खुली दुहेरी १ : विमल हंसराज/विनित रुकारी पराभूत वि. अनिश राणे/कृष्णनील गोरे ०७-१५, ०८-१५; खुली दुहेरी ३ : पराग चोपडा/कपिल बाफना वि.वि. अभिजीत खानविलकर/आनंद शहा १५-१०, १५-११; प्रौढ दुहेरी ४ : नितीन कोनकर/अनिल आगाशे वि.वि. देवव्रत शहाणे/प्रशांत वैद्य १५-०८, १५-०६; प्रौढ दुहेरी ५ : विवेक लिमये/संदीप साठे वि.वि. प्रशांत पंत/अतुल ठोंबरे १५-११, १५-०६; खुली दुहेरी ६ : अश्विन जोशी/हृषिता खुर्जेकर पराभूत वि. अनुज मेहता/सिद्धांत खिंवसरा ११-१५, ०५-१५; खुली दुहेरी ७ : प्रथम पारेख/रोनित जोशी वि.वि. रोहित साठे/नीतल शहा १५-१३, १५-१३; मिश्र दुहेरी २ : आदिती रोडे/अजय पटवर्धन पराभूत वि. जनक वाकणकर/राधिका इंगहळीकर ०२-१५, ०७-१५).
Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…
फाल्कन ऑप्टीमा वि. वि. कारा इंटलेक्ट कियाज ४-३
(सुवर्ण खुली दुहेरी १ : सारंग आठवले/अनिरुद्ध आपटे वि. वि. बिपीन चोभे / हृषिकेश पेंडसे १५-०७, १५-१०; खुली दुहेरी ३ : नीरज दांडेकर/प्रीती फडके वि.वि. राजवीर बोरावके/यश शहा १५-०९, १५-०५; प्रौढ दुहेरी ४ : अभिजित राजवाडे/विजय राठी पराभूत वि. सिद्धार्थ निवसकर/बिपिन देव १०-१५, ०९-१५; प्रौढ दुहेरी ५ : सचिन काळे/संजय शहा पराभूत वि. रणजित पांडे/गौतम लोणकर ०४-१५, ०७-१५; खुली दुहेरी ६ : सचिन जोशी/वरूण निवर्गी वि.वि. नचिकेत जोशी/स्वरूप कुलकर्णी १५-०८, १५-०९; खुली दुहेरी ७ : अन्वित राजवाडे/सुमित नेरकर वि.वि. नकुल बेलवलकर/प्रिशा पटवर्धन १५-१०, १५-१०; मिश्र दुहेरी २ : वरद चितळे/राजश्री भावे पराभूत वि. आरुषी पांडे/आकाश सूर्यवंशी ०६-१५, १२-१५).






