
Football Tournament
ध्रूव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ने नमविले
१६ वर्षांखालील गटात ध्रुव ग्लोबल स्कूलने कल्याणी स्कूलचा ४-१ असा पराभव केला. ध्रुव ग्लोबलकडून समर्थ पेंडलेवाड (३६वे मिनिट), रुशिल कौल (३९वे मिनिट) आणि अर्णव कोरे (४१वे, ४९वे मिनिट) यांनी गोल केले. कल्याणी स्कूलचा एकमेव गोल समन्यू दीक्षितने ३८व्या मिनिटाला केला.
कल्याणी स्कूलने १४ वर्षांखालील आणि १२ वर्षांखालील अशा दोन्ही गटांत सेंट झेवियर्सवर विजय मिळवत दुहेरी यश संपादन केले. १४ वर्षांखालील सामन्यात कल्याणी स्कूलने पिछाडीवरून मुसंडी मारत सेंट झेवियर्सचा २-१ असा पराभव केला. सेंट झेवियर्सच्या समर मार्केने १३व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, कल्याणी स्कूलच्या अक्षय अग्रवालने १५व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर युवान मेहराने ४९व्या मिनिटाला निर्णायक गोल करत कल्याणीला विजय मिळवून दिला.
Football : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!
१२ वर्षांखालील गटातही कल्याणी स्कूलने सेंट झेवियर्सचा २-१ असा पराभव केला. आरजव लुधाडियाने १९व्या आणि २३व्या मिनिटाला गोल करत कल्याणी स्कूलला विजय मिळवून दिला. सेंट झेवियर्सकडून दैविक कुर्हाडेने ३२व्या मिनिटाला एकमेव गोल केला. १२ वर्षांखालील आणखी एका सामन्यात बिशप्स को-एड स्कूल, उंड्रीने हचिंग्ज हायस्कूलचा ४-० असा एकतर्फी पराभव केला. अरमान सिद्दीकीने ११व्या मिनिटाला खाते उघडले. त्यानंतर आरव गुप्ता (२१वे मिनिट), अद्विक नायक (२८वे मिनिट) आणि अक्षज सिन्हा (३४वे मिनिट) यांनी गोल करत संघाचा मोठा विजय निश्चित केला.
पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…
सोमवारी झालेल्या सामन्यांचे निकाल
१२ वर्षांखालील: बिशप्स को-एड स्कूल, उंड्री ४ (अरमान सिद्दीकी ११’, आरव गुप्ता २१’, अद्विक नायक २८’, अक्षज सिन्हा ३४’) वि. हचिंग्ज हायस्कूल ०.
१४ वर्षांखालील : कल्याणी स्कूल २ (अक्षय अग्रवाल १५’, युवान मेहरा ४९’) वि. सेंट झेवियर्स १ (समर मार्के १३’).
१२ वर्षांखालील : कल्याणी स्कूल २ (आरजव लुधाडिया १९’, २३’) वि. सेंट झेवियर्स १ (दैविक कुर्हाडे ३२’).
१६ वर्षांखालील : ध्रुव ग्लोबल स्कूल ४ (समर्थ पेंडलेवाड ३६’, रुशिल कौल ३९’, अर्णव कोरे ४१’, ४९’) वि. कल्याणी स्कूल १ (समन्यू दीक्षित ३८’).