
‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट
पुण्यात ‘स्पार्टन मान्सुन लीग’ स्पर्धेचे आयोजन
चित्तरंजन रेची पुन्हा शतकी धमाका
ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने केल्या 290 रन्स
पुणे/Cricket League: स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे तर्फे आयोजित सहाव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत गट्स अँड ग्लोरी, ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लब आणि कल्याण क्लब या संघांनी (Pune) आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत चित्तरंजन रे याने फटकावलेल्या १२१ धावा आणि वैभव लवांडे याच्या ८८ धावांच्या जोरावर ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने फार्मा इलेव्हन संघाचा १०० धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने पहिल्यांदा खेळताना २९० धावांचे लक्ष्य उभे केले. चित्तरंजन रे ३८ चेंडूत ११ चौकार व १० षटकारांसह १२१ धावा आणि वैभव लवांडे ३५ चेंडूत ९ चौकार व ७ षटकारांसह ८८ धावांची खेळी केली. याला उत्तर देताना फार्मा इलेव्हनने १९० धावा केल्या.
कौशल असबे याने केलेल्या ६४ धावांच्या जोरावर गट् अँड ग्लोरी संघाने सेरेन स्ट्रायकर्सचा ६७ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. कौशल असबे याच्या ६४ धावा आणि सुयश भट याच्या ६३ धावांच्या मदतीने गट् अँड ग्लोरी संघाने १९३ धावांचे लक्ष्य उभे केले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सेरेन स्ट्रायकर्सचा डाव १२५ धावांवर संपुष्टात आला.
यश बेलदरे आणि पृथ्वीराज गायकवाड यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर कल्याण क्लबने लेजंड्स स्पोर्ट्स क्लबचा पाच गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळणाऱ्या लेजंड्स स्पोर्ट्स क्लबचा डाव १८८ धावांवर मर्यादित राहीला. पृथ्वीराज गायकवाड याने ३९ धावांत चार गडी टिपले. हे लक्ष्य कल्याण क्लबने १५.५ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. यश बेलदरे याने २७ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ७२ धावांची खेळी केली. चिराग शेरकर याने ४६ धावांची खेळी केली आणि संघाचा विजय निश्चित केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी
ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद २९० धावा (चित्तरंजन रे १२१ (३८, ११ चौकार, १० षटकार), वैभव लवांडे ८८ (३५, ९ चौकार, ७ षटकार), रवि बोत्रे २-४४, जयराज गौड २-४४) वि.वि. फार्मा इलेव्हनः १६ षटकात १० गडी बाद १९० धावा (अमोल नाजन १०६ (४८, ६ चौकार, १० षटकार), अक्षय परदेशी ३६, नीरज शर्मा ५-३५); सामनावीरः चित्तरंजन रे;
गट् अँड ग्लोरीः २० षटकात ८ गडी बाद १९३ धावा (कौशल असबे ६४, सुयश भट ६३, अमृत अलोक ३-४२, गौरव राठोड २-३९, मयुर क्षीरसागर २-४६) वि.वि. सेरेन स्ट्रायकर्सः १४ षटकात १० गडी बाद १२५ धावा (जय कुमार ३०, सौरज जळगांवकर २२, कपिल गुप्ता ३-२०, मिहीर ओक ३-२०); सामनावीरः कौशल असबे
Badminton चा थरार! पीवायसी कोर्टवर रंगल्या अटीतटीच्या लढती; वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी
लेजंड्स स्पोर्ट्स क्लबः १५.२ षटकात १० गडी बाद १८८ धावा (मयुर गोखले ४६, अमित गणपुले नाबाद ४८, अमोल करमपुरी ३५, पृथ्वीराज गायकवाड ४-३९, राकेश माळी २-३५, श्रेयस सुरवसे २-४०) पराभूत वि. कल्याण क्लबः १५.५ षटकात ५ गडी बाद १८९ धावा (यश बेलदरे नाबाद ७२ (२७, ६ चौकार, ७ षटकार), चिराग शेरकर ४६, रोहीत गुगळे २१, फर्श अन्सारी २-२६, शंतनु आठवले २-३८); सामनावीरः यश बेलदरे.