RCB vs MI: Strong brothers at home, strong enemies on the field..! Hardik, who was upset, was consoled by Krunal, he said.. Watch the video
RCB vs MI : काल वानखेडे स्टेडियमवर महामुकाबाला पार पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभभूत केले. आरसीबीने मोठा पराक्रम केला आहे. आरसीबीने एमआयला त्यांच्याच घरच्याच मैदानावर पराभूत केले. मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ विजयासाठी संघर्ष करताना दिसत आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २२१ धावांचे लक्ष्य मुंबईसमोर ठेवले होते. प्रतिउत्तरात मुंबई लक्ष्याचा पाठलाग करत २०९ धावार्यंतच मजल मारू शकली. या सामन्यात पंड्या भावंडांनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. वास्तविक पहता कृणाल पंड्या भाऊ हार्दिक पंड्यांच्या मुंबईसाठी खलनायक ठरला आहे. कृणाल पांड्याने शेवटच्या षटकात मुंबईच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेतला आहे.
कृणाल पांड्याला अखेरची ओव्हर देण्यात आली. कर्णधाराने दाखवलेल्या विश्वासाच कृणाल चीज करून दाखवल आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये 19 रन्सचा बचाव करायचा होता. त्यावेळी समोर असलेल्या नमन धीर या सर्वात महत्त्वाच्या खेळाडूला बाद करून सामना आरसीबीच्या बाजूने फिरवला. यावेळी हार्दिक पांड्याचं तोंड एकदम उतरून गेलेले दिसून आले होते. अशातच सामना झाल्यानंतर कृणालने आपली भावना व्यक्त केली.
Nothing, me and my bro after having the toughest fight ever pic.twitter.com/hppF3bqXEn
— Gagan🇮🇳 (@1no_aalsi_) April 7, 2025
हेही वाचा : ‘दुर्दैवाने, माझा प्रवास इथेच..’ ऑस्ट्रेलियन सलामीवीराचा क्रिकेटला तडकाफडकी अलविदा! क्रीडा विश्वात खळबळ..
कृणाल म्हणाला की, हार्दिक आणि माझ्यात असलेलं नातं सर्वांना माहिती आहे. आम्हाला माहित होतं की या सामन्यात केवळ एकच पंड्या जिंकणार होता, आमचं एकमेकांबद्दल असलेले प्रेम आणि आपुलकी खूप नैसर्गिक अशी आहे. हार्दिकने खरच चांगली फलंदाजी केली आणि मला त्याच्याबद्दल खूप भावना आहेत, पण आम्ही जिंकलो हे जास्त महत्वाचे आहे. अशी भावना कृणाल पांड्याने व्यक्त केली.
कृणाल म्हणाला की, जेव्हा मी गोलंदाजीला आलो तेव्हा सँटनर फलंदाजी करत होता आणि लेग साईड ही लहान होती आणि गेल्या 10 वर्षांत मी येथे जेवढे सामने खेळलो आहे, तिथं कधीतरी अनुभव कामी आलाच पाहिजे. मी त्यापद्धतीने बॉलिंग करत राहिलो अन् टीमच्या कामाला आलो. तुम्ही मैदानात खेळत असताना एक बॉलर म्हणून १०० टक्के द्यायला पाहिजे आणि तोच प्रयत्न मी या सामन्यात केला, असं कृणाल पांड्याने सांगितले.
हेही वाचा : MI vs RCB : कोहलीचा स्वॅगच निराळा! धोकादायक बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर लगावला षटकार.., पहा व्हिडिओ
मुंबई इंडियन्स : विल जॅक, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), नमन धीर,हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल.