नवी दिल्ली – भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथे पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने धमाकेदार फलंदाजी करताना १६ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. त्याच्या या खेळीदरम्यान त्याने स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात झोडपून काढले.
World record alert: 35 runs in a single over – Bumrah is the hero. pic.twitter.com/B43Ic5T9mD
— Johns. (@CricCrazyJohns) July 2, 2022
या षटकात ब्रॉडने ३५ धावा दिल्या. कसोटी क्रिकेटच्या १४५वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले. यासोबतच बुमराहने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ब्रायन लाराचा कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडला.
स्टुअर्ट ब्रॉड भारतीय डावाच्या ८४व्या षटकात आला आणि त्याच षटकात ३५ धावा झाल्या. ज्यामध्ये बुमराहच्या बॅटमधून २९ धावा आल्या आणि उर्वरित ६ अतिरिक्त धावा होत्या. बुमराहच्या ३१ पैकी २९ धावा या षटकात आल्या.