शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Shubman Gill sets world record : मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा या सामना खेळला जात आहे. शुभमन गिलने या चौथ्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले. या शतकासह गिलने विक्रमांची रास रचली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू देखील बनला आहे. यासोबतच, कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या कसोटी मालिकेत त्याने चार शतके झळकावले आहे. असे करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे.
भारताचा युवा कर्णधार गिलने मँचेस्टरमध्ये शतक झळकावताच, या मालिकेत चौथे शतक पूर्ण केले आहे. कर्णधारपद म्हणून पदार्पणाच्या पहिल्या मालिकेत सर्वाधिक शतके झळकावणारा गिल जगातील पहिला कर्णधारठरला आहे. यापूर्वी, कोणत्याही खेळाडूला असा कारनामा करता आलेला नाही. केवळ पाच खेळाडूंनी आपल्या कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या पहिल्या मालिकेत प्रत्येकी तीन शतके झळकावली आहेत.
हेही वाचा : Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामना होणारच! BCCI ची स्पष्ट भूमिका..
त्यांच्या कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या मालिकेत, वॉर्विक आर्मस्ट्राँग, सर डॉन ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांनी प्रत्येकी तीन शतके लगावली आहेत. यासह, शुभमन गिल इंग्लंडमध्ये एका मालिकेत ७०० धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज देखील बनला आहे. याशिवाय गिलने अनेक विक्रमही आपल्या नावावर जमा केला आहेत.
𝙄. 𝘾. 𝙔. 𝙈. 𝙄
Joint-most hundreds 💯 in a Test series by a captain 👏 👏
Shubman Gill joins the list 👍 👍
Updates ▶️ https://t.co/L1EVgGtx3a#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/OVFylSahbz
— BCCI (@BCCI) July 27, 2025
शुबमन गिल मँचेस्टरमध्ये सचिन तेंडुलकरनंतर शतक झळकावणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. ३५ वर्षांनंतर या मैदानावर एका भारतीय फलंदाजाला शतक झळकावण्यात यश आले आहे. तथापि, शतक झळकावल्यानंतर शुभमन गिल १०३ धावांवर माघारी गेला. त्याच वेळी, शुभमन गिल कसोटी कर्णधार म्हणून पहिल्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. या बाबतीत सर डॉन ब्रॅडमन पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत. त्यांनी त्यांच्या पहिल्या मालिकेत ८१० धावा फटकावल्या होत्या.
हेही वाचा : Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीसाठी दक्षिण विभागीय संघ जाहीर! कर्णधारपदी तिलक वर्माची लागली वर्णी