इतिहासाच्या पानांवर अनेक माेठ्या युद्धांची नोंदणी करण्यात आली आहे. पण तुम्ही कधी जगातील सर्वात लहान युद्धाविषयी ऐकले आहे का? २७ ऑगस्ट १८९६ रोजी ब्रिटन आणि झांझिबार (आता टांझानिया) यांच्यात युद्ध झाले होते. या युद्धाची नोंदणी इतिहासात तर झाली पण यामागचे मुख्य कारण ठरली युद्धाची वेळ! युद्ध सुरु होताच ते अवघ्या काही मिनिटांतच संपले आणि इतिहासातील सर्वात कमी काळ टिकणारे आणि लहान युद्ध म्हणून या युद्धाची ओळख बनली. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे युद्ध फक्त ३८ मिनिटांत संपले.
The Breakfast War : इतिहासातील सर्वात लहान युद्ध! जेवण जेवून संपावं इतक्या कमी वेळेत शत्रूने पत्कारली शरणागती
हे युद्ध राजकीय वादामुळे सुरु झाले होते. सुलतान सय्यद हमद बिन थुवैनीच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या खालिद बिन बरगाशने सत्ता हाती घेतली, परंतु ब्रिटनला हे मान्य नव्हते, ज्यामुळे त्यांनी आपल्या पसंतीच्या सुलतानला गादीवर बसवण्याचे निर्णय घेतला.
ब्रिटनने खालिदला सुलतान पदावरून निघून जाण्याचा इशार दिला आणि त्यांच्या आदेशाचे तात्काळ पालन करण्याचा अल्टिमेटम दिला. पण बागघाशला सत्ता सोडायची नव्हती ज्यामुळे त्याने राजवाड्याभोवती ३,००० सैनिक तैनात करुन आपली स्थिता मजबूत केली
खालिद काही केल्या मागे हटत नव्हता परिणामी २७ ऑगस्ट १८९६ रोजी सकाळी ब्रिटिश सैन्याने झांझिबारच्या राजवाड्यावर हल्ला केला. ब्रिटनचे लष्करी सामर्थ्य इतके मोठे होते की त्यासमोर स्थानिक सैनिक टिकू शकले नाही
हा लढाई फक्त ३८ मिनिटे चालली. इतक्या कमी वेळात खालिदच्या सैन्यांनी आपली हार स्वीकारली ज्यामुळे ते इतिहासातील सर्वात लहान आणि वेगवाग युद्ध ठरले. यानंतर लगेचेच ब्रिटनने आपला सुलतान हमुद बिन मोहम्मद याला गादीवर बसवले आणि खालिद बिन बरगाशला जर्मनच्या दूतावासात आश्रय घेऊन आपला जीव वाचवावा लागला
इतिहासातील या लहान युद्धात झांझिबारच्या ५०० सैनिकांचे नुकसान झाले. ब्रिटीश सैन्याचे मात्र यात कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. ३८ मिनिटांत संपलेले हे युद्ध जगातील सर्वात लहान युद्ध म्हणून ओळखले जाते