जगात अनेक प्रकारच्या पराक्रमाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पण आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका रेकाॅर्डविषयी माहिती सांगणार आहोत, ज्याविषयी ऐकताच तुम्ही तुमच्या डोक्याला हात लावाल. हा रेकाॅर्ड आहे, सर्वात जास्त मुले जन्माला घालण्याचा रेकाॅर्ड. बहुतेक लोक हे लग्नानंतर एक किंवा दोन मुले जन्माला घालतात पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीविषयी माहिती सांगत आहोत ज्याने आजपर्यंत १०२ मुलांना जन्माला घातले आहे. त्याला एकूण १२ बायका आहेत आणि यासहच त्याला एकूण ५७८ नातवंडही आहेत.
जगातील सर्वाधिक मुले जन्माला घालणारा माणूस!
हा व्यक्ती युगांडातील एक शेतकरी आहे ज्याचे नाव मोशे हसैया कासेरा असे आहे. आपल्या सर्वाधिक मुलांसह त्याने नवीन वर्ल्ड रेकाॅर्ड बनवला आहे. तो पूर्वेकडील मुकिझा जिल्ह्यातील बुगीसा गावात राहतो.
मुसा म्हणतो की, त्याला ४०-५० मुलांची नावे आठवतात, बाकीच्यांची नावे तो रजिस्टर पाहून सांगतो. १९७२ साली त्याने वयाच्या १७ व्या वर्षी पहिले लग्न केले. यानंतर त्याचे कुटुंब सातत्याने वाढतच गेले
मुसा सहावीपर्यंत शिकला आहे आणि सध्या तो कोणतेही विशेष असे काम करत नाही.
असे म्हटले जाते की, त्याच्या कुटुंबाचा आकार इतका मोठा आहे की स्थानिक प्रशासनालाही त्याचे व्यवस्थापन करणे आता कठीण झाले आहे
मुसाने हे कबूल केले आहे की, इतक्या मोठ्या कुटुंबाला अन्न आणि इतर गरजा पुरवणे खरंच कठीण होऊन बसलं आहे. ही कहाणी फारच विलक्षण असून मागील काही काळापासून ती सोशल मिडियावर ट्रेंड होत आहे