Champion Trophy 2025: India will benefit from Dubai pitch! Objections from veterans; Rohit Sharma breaks silence, gives a clear answer, says..
Champion Trophy 2025 : क्रिकेट जगतात सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार सूरु आहे. नुकतेच साखळी फेरीतील सामने संपले असून शेवटच्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपले खेळाडू पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. पण, आता मात्र टीम इंडियाचा दमदार विजय पाहता इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. सर्व सामने दुबईत होत असल्यामुळे भारताला इतर संघांपेक्षा अन्यायकारक फायदा मिळत असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने या वादावर अखेर मौन सोडले आहे.
सर्व सामने दुबईत होत असल्यामुळे भारताला इतर संघांपेक्षा अन्यायकारक फायदा मिळत असल्याची टीका होत आहे. या टीकेला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, दुबईतील एकाच मैदानावर सर्व सामने खेळत असल्याने भारतीय संघाला कोणताही अनुचित फायदा मिळत नाही आहे. दुबईचे मैदान हे काही टीम इंडियाचे ‘होम वेन्यू’ नाही, असे चोख उत्तर रोहित शर्माने दिले आहे. भारतीय कर्णधार शर्मा पुढे म्हणाला की, ‘आमच्या खेळाडूंसाठी देखील हा सर्व हा नवा अनुभव आहे. आम्ही येथे 3 सामने खेळलो आणि तिन्ही वेळा खेळपट्टी वेगळ्या पद्धतीने समोर आली. प्रत्येक वेळी आम्हाला नवीन आव्हानाला सामोरे जावे लागले. हे आमचे घर नसून, हे दुबई आहे. आम्ही येथे जास्त सामने खेळत नाही त्यामुळे आमच्यासाठीही हे सर्व नवीन आहे.
हेही वाचा : IPL 2025 : अखेर KKR ला नवीन कर्णधार मिळाला; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूकडे सोपविली संघाची धुरा..
कर्णधार रोहित पुढे म्हणाला, ‘येथे ४-५ पृष्ठभाग वापरले जात आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत सामना नेमका कोणत्या खेळपट्टीवर खेळवला जाईल? हे मला माहीत नाही. पण काहीही झाले तरी त्यानुसार स्वतःला जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यानुसारच आम्ही मैदानात उतरू. तसेच तों पुढे म्हणाला की, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होत असल्याचे आमच्या आम्ही पाहिले आहे. परंतु, पहिल्या दोन सामन्यांमध्ये आमचे गोलंदाज गोलंदाजी करत होते तेव्हा मात्र हे दिसून आले नाही. मागच्या सामन्यात फारशी फिरकील मदत मिळाली नव्हती, पण न्यूझीलंडच्या सामन्यात मात्र फिरकीचा जोर दिसून आला. याचा अर्थ प्रत्येक पिचवर काहीतरी वेगळे घडून येत आहे. त्यामुळे खेळपट्टीवर काय होणार आहे आणि काय नाही? हे समजेलच असे होत नाही.
हेही वाचा : इंग्लंडचे कर्णधारपद सोडल्यानंतर जोस बटलर भावुक, इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
सेमी फायनलच्या फेरीबाबत रोहित म्हणाला की, ‘खेळपट्टीवर गोलंदाजांना थोडी मदत मिळाली तर सामना चांगलाच रंजक होतो. मला यामध्ये काही अडचण नाही. तुम्हाला स्पिन किंवा सीमला आव्हान देणारा पृष्ठभाग हवा असतो. आम्हाला एक चांगला सामना हवा आहे.’ असे रोहित म्हणाला.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा