फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
जोस बटलर : इंग्लंडच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीआधी त्याचबरोबर सुरु असलेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे संघ सेमीफायनलमध्ये पोचवू शकला नाही. इंग्लंडचा संघ जोस बटलरच्या नेतृत्वात विशेष कामगिरी करू शकला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाला एकही सामना जिंकता आला नाही. पत्रकार परिषदेमध्ये त्याने कर्णधार पद सोडल्याची माहिती दिली होती.
कर्णधारपद सोडल्यानंतर, त्याने आता इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, जिथे त्याने त्याच्या कर्णधारपदाबद्दल सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याने शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘इंग्लंडचे नेतृत्व करणे हा एक मोठा सन्मान आहे आणि मला नेहमीच असे करण्याचा अभिमान असेल. निकाल स्पष्ट आहेत आणि माझ्यासाठी आणि संघासाठी हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. कर्णधार म्हणून मला पाठिंबा देणाऱ्या सर्व खेळाडू आणि इंग्लंड चाहत्यांचे मी या संधीचा फायदा घेत आभार मानू इच्छितो. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी माझी पत्नी लुईस आणि माझ्या कुटुंबाचे आभार मानू इच्छितो. माझ्या नोकरीतील चढ-उतारांमध्ये तुम्ही माझ्यासाठी अढळ आधारस्तंभ आहात.
३४ वर्षीय बटलरने इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यापूर्वी ही घोषणा केली आणि कर्णधारपदाचा कार्यकाळ संपवला. बटलरने कबूल केले की चॅम्पियन्स ट्रॉफीमधून संघाच्या बाहेर पडण्यामुळे त्याचा निर्णय घेण्यात आला होता, जिथे त्यांना ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. बटलरने कर्णधारपद सोडल्यानंतर, आता संघाचा उपकर्णधार हॅरी ब्रूक कर्णधार होण्यासाठी सर्वात लोकप्रिय असल्याचे दिसून येत आहे.
Jos Buttler pens a heartfelt message after resigning as England’s white-ball captain. pic.twitter.com/qtDTuzlU9S
— Circle of Cricket (@circleofcricket) March 3, 2025
इंग्लडचा संघ हा क्रिकेट विश्वामध्ये एक मजबूत संघ आहे. इंग्लडच्या संघासाठी मागील काही वर्षांमध्ये आयसीसी स्पर्धेमधील कामगिरी फार काही चांगली राहिली नाही. २०२४ च्या T२० विश्वचषकामध्ये इंग्लंडला सेमीफायनलमध्ये पराभूत केले होते. आता सुरु असलेल्या सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने एकही सामन्यांमध्ये विजय मिळवला नाही. त्याचबरोबर चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी इंग्लंडच्या संघाच्या दोन मालिका झाल्या यामध्ये तीन सामान्यांची T२० मालिका तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. या दोन्ही मालिकांमध्ये भारताच्या संघाने इंग्लंडला एकही सामना जिंकू दिला नाही.