IPL 2025 : अखेर KKR ला नवीन कर्णधार मिळाला(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएलचा 18 वा हंगामचा थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांकडून आपापल्या कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे. या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सने देखील आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. केकेआरकडून कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता केवळ दिल्लीच्या संघाच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. दिल्ली संघाने अद्यापही आपल्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही.
केकेआर आपल्या पहिल्या सामन्यात आरसीबीसोबत भिडणार आहे. आरसीबीकडूनही काही दिवसांपूर्वी आपल्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आरसीबीच्या कर्णधार पदाच्या शर्यतीत विराट कोहलीसह रजत पाटीदारचे नाव चर्चेत होते. अखेर कर्णधारपदी रजत पाटीदारच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आज केकेआरने अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. आयपीएलमध्ये तीन वेळा विजेता राहिलेल्या केकेआरने मागील हंगामातील विजेता कर्णधार श्रेयस अय्यरला मुक्त केले आहे. त्यानंतर फ्रँचायझीकडून नवीन कर्णधाराचा शोध सुरू करण्यात आला आणि अखेर अजिंक्य राहाणेच्या नावाला पसंती देण्यात आली.
हेही वाचा : IND vs NZ: विराट कोहलीचे पदक ड्रेसिंग रूममधून गायब; खेळाडूंची केली कसून तपासणी, अखेर मिळालं; पाहा व्हिडओ…
भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला कोलकाता फ्रँचायझीने गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 1.50 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. त्याच्याकडे आता केकेआर संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर, व्यंकटेश अय्यरला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रहाणेशिवाय व्यंकटेश अय्यरचेही नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. मात्र, केकेआरकडून अजिंक्य रहाणेच्या नावावर शिक्कामोर्तब करत विश्वास व्यक्त केला आहे. तर व्यंकटेश अय्यरला उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. व्यंकटेश अय्यरला केकेआरने २३.७५ कोटी रुपये मोजून आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
🚨 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗔𝗻𝗻𝗼𝘂𝗻𝗰𝗲𝗺𝗲𝗻𝘁 – Ajinkya Rahane named captain of KKR. Venkatesh Iyer named Vice-Captain of KKR for TATA IPL 2025. pic.twitter.com/F6RAccqkmW
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 3, 2025
हेही वाचा : IND vs AUS: सेमी फायनलमध्ये केएल राहुलला खेळवण्यास संभ्रम? ऋषभ पंतला मिळणार संधी, नेमकं कारण काय?
केकेआरच्या कर्णधारांची यादी
आयपीएल 2025 साठी केकेआरचा संघ :-
अजिंक्य राहाणे(कर्णधार) रिंकू सिंह, सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा और रमनदीप सिंह, व्यंकटेश अय्यर(उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज़, एनरिक नॉर्टजे, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोड़ा, मयंक मारकंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेंसर जॉनसन, लवनीथ सिसोदिया, अनुकूल रॉय, मोइन अली, उमरान मलिक