Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy 2025 : रिकी पॉन्टिंग आणि धोनीसारख्या दिग्गज कर्णधारांना रोहितने टाकलं मागे! विजयाचं शतक केलं पूर्ण

काल झालेल्या बांग्लादेश विरुद्ध सामन्यांमध्ये ११००० धावांचा टप्पा तर पार केला आहेच आता त्यांनी आणखी एक विक्रम नावावर केला आहे. रोहित शर्माने रिकी पॉन्टिंग, धोनी, विराट कोहली यासारख्या दिग्गज कर्णधारांना त्याने मागे टाकले

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 21, 2025 | 02:54 PM
फोटो सौजन्य - Mufaddal Vohra सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Mufaddal Vohra सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

कर्णधार रोहित शर्मा : भारताच्या संघाने मागील काही वर्षांमध्ये रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये कमालीची कामगिरी सातत्याने केली आहे. भारताच्या संघाने २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात T२० विश्वचषक जिंकला आणि संपूर्ण भारतामध्ये त्याचा जल्लोष साजरा करण्यात आला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडियाने बांगलादेशला हरवून विजयाने सुरुवात केली आहे. काल झालेल्या बांग्लादेश विरुद्ध सामन्यांमध्ये ११००० धावांचा टप्पा तर पार केला आहेच आता त्यांनी आणखी एक विक्रम नावावर केला आहे.

Champions Trophy 2025 : अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका सामन्याचा शुभारंभ! साऊथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

रोहित शर्माने रिकी पॉन्टिंग, कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली यासारख्या दिग्गज कर्णधारांना त्याने मागे टाकले आहे. बांगलादेशविरुद्धचा विजय हा रोहित शर्माचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० वा विजय होता. हा विजय रोहितसाठीही खास होता कारण या विजयासोबत त्याने धोनी आणि रिकी पॉन्टिंग सारख्या दिग्गज कर्णधारांनाही मागे टाकले.

विजयाच्या टक्केवारीत आघाडीवर

रोहित शर्माने आतापर्यंत १३९ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे ज्यापैकी संघाने १०० सामने जिंकले आहेत. जर आपण कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या विजयाच्या टक्केवारीबद्दल बोललो तर ते ७३ आहे. या बाबतीत त्याने रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे. रिकी पॉन्टिंगने ३२४ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे, त्यापैकी त्याने २२० सामने जिंकले आहेत आणि ७७ सामने गमावले आहेत. त्याची विजयाची टक्केवारी ६७.९० आहे.

ROHIT SHARMA HAS WON 100 MATCHES AS CAPTAIN FROM JUST 138 GAMES 🤯 pic.twitter.com/sLjI4O1Tyd — Johns. (@CricCrazyJohns) February 21, 2025

रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार आहे, त्याने आयपीएलपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत हे सिद्ध केले आहे. कर्णधारपद भूषवताना रोहित शर्माने १२ कसोटी, २८ एकदिवसीय आणि ५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. अलिकडे, रोहितच्या नेतृत्वाखाली, कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी निश्चितच घसरली आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय आणि टी-२० मध्ये टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे.

कर्णधाराचे नाव सामने जीत हार जिंकण्याची टक्केवारी (%)
रोहित शर्मा 137 100 33 73.00%
रिकी पाॅटिंग 324 220 77 67.90%
स्टीव वॉ 163 108 44 66.25%
हॅन्सी क्रोनी 191 126 46 65.96%
विराट कोहली 213 137 60 64.00%
क्लाइव लॉयड 158 100 30 63.00%

भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दमदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने बांग्लादेश पराभूत केले आहे, आता भारताचा पुढील सामना २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी सर्व क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. तर टीम इंडियाचा शेवटचा सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. ग्रुप अ मधील न्यूझीलंडचा संघ एक मजबूत संघ आहे. पाकिस्तानच्या संघाला भारताविरुद्ध होणारा सामना जिंकणे अनिवार्य आहे तर त्या सामन्यात पाकिस्तानचा संघ पराभूत झाल्यास संघ सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर होईल.

Web Title: Champions trophy 2025 under the leadership of rohit sharma team india won 100 matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • india vs Bangladesh
  • Rohit Sharma
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
2

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
3

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

DDCA च्या कामकाजाची पुन्हा एकदा झाली छाननी सुरू, Vinoo Mankad Trophy-19 संघाची चाचणीशिवाय स्पर्धेसाठी निवड
4

DDCA च्या कामकाजाची पुन्हा एकदा झाली छाननी सुरू, Vinoo Mankad Trophy-19 संघाची चाचणीशिवाय स्पर्धेसाठी निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.