फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board सोशल मीडिया
Champions Trophy 2025 – Afghanistan vs South Africa : चॅम्पियन ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे, हे दोन्ही संघ ग्रुप ब मधील आहेत. या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ टेम्बा बाऊमाच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांपासून सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. तर अफगाणिस्तानचा संघ हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वात संघ मैदानात उतरणार आहे. ग्रुप ब चा संघाचा आज पहिला सामना आज अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु झाला आहे. यामध्ये विशेषतः अफगाणिस्तानच्या संघावर क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.
🚨 TOSS NEWS! 🚨
South Africa won the toss and opted to bat first. 👍#AfghanAtalan | #ChampionsTrophy | #AFGvSA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/ztZKsKA2B1
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 21, 2025
अफगाणिस्तानच्या संघामध्ये मोहम्मद नबी, फजलहक फारुकी, रशीद खानसारखे दमदार खेळाडू आणि त्यांची दमदार गोलंदाजी पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या सामन्याची सुरुवात २.३० मिनिटांनी होणार आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानसमोर फलंदाजीचे आव्हान दक्षिण आफ्रिकेचे असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा दमदार गोलंदाज आहेत त्याचा सामना करणे नक्कीच अफगाणिस्तान संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. आता अफगाणिस्तानचा संघ कशाप्रकारे कामगिरी करेल हे पाहणं मनोरंजक ठरेल.
२०२४ मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने त्यांच्या कामगिरीने सर्वानाच चकित केले होते आणि बलाढ्य संघाला पाणी पाजले होते. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ T२० विश्वचषकामध्ये एकही सामान न गमावता फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाला फायनलमध्ये भारताच्या संघाने पराभूत करून विश्वचषक नावावर केला होता. त्रिकोणी मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती पण यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने कविजय मिळवला होता. पण आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे क्रिकेट चाहत्यांची विशेष नजर असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेची एकदिवसीय सामन्यांमध्ये कामगिरी अलिकडे चांगली राहिलेली नाही. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याने खेळलेले १४ एकदिवसीय सामने. यापैकी त्याने फक्त चार सामने जिंकले. सलग सहा सामने गमावल्यानंतर तो या स्पर्धेत प्रवेश करत आहे.
टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झॉर्झी, रस्सी वैन डर दुसें, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
रहमानुल्ला गुरबाज (विकेटकिपर), इब्राहिम जरदान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, फजलहक फारुकी, रशीद खान, नूर अहमद.
बातमी अपडेट होत आहे…