Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार हा चेन्नई सुपर किंग्सचा स्टार गोलंदाज

भारताचे अनेक खेळाडू असे आहेत जे टीम इंडियाचा भाग नाही किंवा त्यांना मागील काही महिन्यांमध्ये भारतीय संघामध्ये स्थान मिळालं नाही अशा खेळाडूंनी आता काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 29, 2025 | 02:08 PM
फोटो सौजन्य – X (Essex Cricket)

फोटो सौजन्य – X (Essex Cricket)

Follow Us
Follow Us:

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच जणांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना झाला आहे आणि या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघामध्ये स्थान मिळाले. यामध्ये साई सुदर्शन, अर्शदीप सिंह यांसारख्या नावांचा समावेश आहे. अजून टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध चार कसोटी सामने खेळणार आहे. भारताचे अनेक खेळाडू असे आहेत जे टीम इंडियाचा भाग नाही किंवा त्यांना मागील काही महिन्यांमध्ये भारतीय संघामध्ये स्थान मिळालं नाही अशा खेळाडूंनी आता काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद पुढील काही महिने इंग्लंडमध्ये राहणार आहे. तो इंडिया अ संघासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, पण आता त्याला इंग्लंडमध्ये अनेक सामने खेळायचे आहेत. तथापि, त्याला टीम इंडियासाठी कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नाही आणि तो मुख्य संघाचा भागही नाही. यामुळेच तो आता मोकळा आहे आणि कसोटी संघात परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. म्हणूनच त्याने इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय तो इंग्लंडच्या काउंटी क्लबसाठी एकदिवसीय सामने देखील खेळणार आहे.

WI vs AUS : तिसऱ्या पंचावर केलेले आरोप वेस्ट इंडिजच्या प्रशिक्षकाला पडले महागात, ICC ने केली कारवाई

खलील अहमद २०२५ च्या हंगामाच्या अखेरीपर्यंत काउंटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय कपसाठी इंग्लिश देशांतर्गत संघ एसेक्समध्ये सामील झाला आहे. एसेक्स क्रिकेट क्लबने शनिवारी याची घोषणा केली. एसेक्सने जारी केलेल्या मीडिया रिलीजमध्ये म्हटले आहे की, “एसेक्स क्रिकेट हंगामाच्या अखेरीपर्यंत भारतीय वेगवान गोलंदाज खलील अहमदचा संघात समावेश करण्याची घोषणा करण्यास उत्सुक आहे. अहमद २०२५ च्या हंगामाच्या अखेरीपर्यंत क्लबकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल. तो काउंटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय कप दोन्हीसाठी उपलब्ध असेल.”

Looking good in Essex threads 🧵 🦅 #FlyLikeAnEagle pic.twitter.com/5UGpgxoU0h — Essex Cricket (@EssexCricket) June 28, 2025

डावखुरा वेगवान गोलंदाज अहमद २०२५ च्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आणि त्याने शानदार कामगिरी केली. सीएसकेच्या खराब हंगामात, खलील अहमदने संघात काही आशा निर्माण केली आणि हंगामात १५ बळी घेतले. तो सीएसकेसाठी सर्वाधिक बळी घेणारा आणि अफगाण लेग-स्पिनर नूर अहमदनंतर संघासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. त्याच्या १३७ डॉट बॉलमुळे तो आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. खलील अहमद व्यतिरिक्त, या हंगामात काउंटी क्रिकेटमध्ये इतर अनेक क्रिकेटपटू दिसणार आहेत, ज्यात तिलक वर्मा, युजवेंद्र चहल आणि इशान किशन सारखी मोठी नावे आहेत.

Web Title: Chennai super kings star bowler khaleel ahmed will be seen playing in county cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • cricket
  • Khaleel Ahmed
  • Sports

संबंधित बातम्या

‘ओल्ड इज गोल्ड’! Imran Tahir च्या फिरकीसमोर फलंदाज बेहाल; 47 व्या वर्षी Fifer घेत रचला विश्वविक्रम
1

‘ओल्ड इज गोल्ड’! Imran Tahir च्या फिरकीसमोर फलंदाज बेहाल; 47 व्या वर्षी Fifer घेत रचला विश्वविक्रम

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम
2

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी
3

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.