फोटो सौजन्य – X (ICC)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना पार पडला, या पहिल्याच सामन्यात अंपायरच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळाले. वेस्ट इंडिज संघ सध्या ऑस्ट्रेलियासोबत घरच्या मैदानावर २ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना बार्बाडोसमध्ये खेळला गेला होता, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
पहिल्या सामन्यात थर्ड अंपायरच्या अनेक निर्णयांवर वाद झाला. यापैकी बहुतेक तिसऱ्या पंचाचे निर्णय वेस्ट इंडिजच्या विरोधात होते, ज्यावर वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनीही सामन्यानंतर पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केले. आता थर्ड अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे डॅरेन सॅमीला महागात पडले आहे. थर्ड अंपायरच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल आयसीसीने सॅमीला शिक्षा दिली आहे.
MLC 2025 : फलंदाजीत फ्लाॅप झालेल्या या खेळाडूने गोलंदाजीत घेतले 5 विकेट्स, बदलला खेळ
पहिल्या कसोटी सामन्यात डॅरेन सॅमीने थर्ड अंपायर एड्रियन होल्डस्टॉकच्या अनेक निर्णयांवर नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये थर्ड अंपायरने ट्रॅव्हिस हेडला नॉट आऊट आणि नंतर शाई होपला आऊट घोषित करणे समाविष्ट होते. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीनला नॉट आऊट घोषित करण्यात आले आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसला एलबीडब्ल्यू घोषित करण्यात आले.
Breaking 🚨
Daren Sammy has been fined 15% of his match fee and handed one demerit point for his comments about third umpire Adrian Holdstock. pic.twitter.com/dd6xGY2D8J
— paRaY_YasiR ✍️ (@ParayYasir2) June 28, 2025
या सर्व निर्णयांचा संदर्भ देत डॅरेन सॅमी म्हणाले होते की, “बाहेर आलेले फोटो पाहता असे दिसते की जे काही निर्णय घेण्यात आले ते दोन्ही संघांसाठी योग्य नव्हते आणि मला फक्त निष्पक्षता हवी आहे.” यानंतर, आता आयसीसीने वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. ज्यामुळे आयसीसीने डॅरेन सॅमीवर मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावला आहे. आयसीसीने वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सवरही सामना शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावला होता.
जेडेन सील्सने शानदार गोलंदाजी केली आणि पहिल्या डावात ५ बळी घेतले. यादरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची विकेट घेतल्यानंतर त्याने त्याला ड्रेसिंग रूममध्ये जाण्याचा इशारा केला, ज्यावर आयसीसीने कारवाई केली. पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजची फलंदाजी खूपच खराब होती. संघाने पहिल्या डावात १९० धावा केल्या आणि दुसऱ्या डावात फक्त १४१ धावा केल्या. दुसऱ्या डावात, तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात संपूर्ण वेस्ट इंडिज संघ ऑलआउट झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १५९ धावांनी सामना जिंकला.