
महेंद्रसिंह धोनी
इंटरनॅशनल क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरी देखील धोनीची क्रेझ आज देखील पाहायला मिळते. त्याची मैदानावर एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. अशातच चेन्नई सुपर किंग्स (CSK) फ्रँचायझीने धोनीच्या आयपीएलमधील भविष्याबाबत एक महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट विधान केले आहे.
सर्वात मोठी बातमी! MS Dhoni IPL 2027 खेळणार की नाही? ‘या’ खेळाडूने दिलेली प्रतिक्रिया एकदा वाचाच…
45 वर्षीय धोनी 2027 मध्ये आयपीएलच्या 20 व्या हंगामात खेळणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथनने भाष्य केले आहे. ज्यामुळे चाहत्यांची चिंता काही प्रमाणात कमी झाल्याचे म्हटले जात आहे.धोनीच्या भविष्याबाबतचा निर्णय पूर्णपणे त्याचाच असणार आहे. फ्रँचायझी नेहमीच धोनीच्या निर्णयाचा आदर करते. संघ व्यवस्थापनाचा विश्वास आहे की, धोनी स्वतः आपल्या तंदुरुस्तीचा आणि मानसिक स्थितीचा अंदाज घेऊन योग्य तो निर्णय घेईल. संघ त्याला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करणार नाही.
2026 मध्ये सीएसकेचे प्रदर्शन कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खास राहिले नव्हते. त्याच्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महेंद्रसिंह धोनी पूर्ण आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकला नव्हता. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र पुढील हंगामात तो खेळणार की नाही ही लवकरच स्पष्ट होणार आहे. पुढील हंगामात तो खेळावा अशी त्याच्या चाहत्यांची आणि क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.
आता चेन्नई जिंकणारच! CSK चा ‘कर्ता धर्ता’ MS Dhoni ‘या’ दिवशी उतरणार मैदानात? मोठी अपडेट आली समोर
MS Dhoni IPL 2027 खेळणार की नाही?
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जकडून महेंद्रसिंह धोनी एकही सामना खेळू शकला नव्हता. त्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मैदानात दिसला नाही. अनेकदा त्याने नेट्समध्ये सराव केल्याचे समोर आले होते. मात्र तो अधिकृत सामना खेळू शकला नव्हता. सीएककेचा माजी फलंदाज बद्रिनाथने धोनीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या माहितीनुसार, ‘महेंद्रसिंह धोनी स्वतःला इपॅक्ट प्लेयर म्हणून पाहत नाही. तो पूर्ण वेळ मैदानावर विकेटकिपर म्हणून खेळण्यास पसंती देतो.