Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess Championship : राष्ट्रकुल पदकविजेत्या मायशाची विजयी चाल; राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मानांकितांची सलामी

Chess Championship : महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत राष्ट्रकुल पदकविजेत्या मायशा परवेझची विजयी सलामी. मुंबईत सुरू झालेल्या स्पर्धेत सहा गटांत 417 बुद्धिबळपटू सहभागी.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 04, 2026 | 09:52 PM
Chess Championship : राष्ट्रकुल पदकविजेत्या मायशाची विजयी चाल; राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मानांकितांची सलामी

Chess Championship : राष्ट्रकुल पदकविजेत्या मायशाची विजयी चाल; राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मानांकितांची सलामी

Follow Us
Follow Us:
  • मायशाची विजयी सलामी
  • युवा बुद्धिबळपटूंकडे लक्ष
  • 6 नोव्हेंबरपर्यंत रंगणार स्पर्धा
 

एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (Chess Championship) अग्रमानांकित बुद्धिबळपटूंनी पहिल्याच फेरीत आपले वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या मायशा परवेझने विजयी सलामी देत स्पर्धेत दमदार सुरुवात केली. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दहिसर पश्चिम येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. सात, 11 आणि 15 वर्षांखालील मुला-मुलींच्या अशा सहा गटांत एकूण 417 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. इंडियन चेस स्कूल आयोजित ही सात फेऱ्यांची स्पर्धा 6 नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.

मायशाची विजयी सलामी

15 वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित एएफएम मायशा परवेझ (1991) हिने अनन्या जयदीप धमालवर सहज मात केली. सी. पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मायशाने विजयासह स्पर्धेतील आपले आव्हान मजबूत केले. याच गटात प्रणिता भावा आणि खानक पहारिया यांनीही विजय नोंदवले.

15 वर्षांखालील मुलांच्या गटात समविद पासबोला, विहान अग्रवाल आणि रायन मर्चंट यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सुरुवात केली.

WPL 2027 चं वेळापत्रक जाहीर! ट्रॉफीसाठी भिडणार पाच संघ; कधी, कुठे अन् केव्हा रंगणार थरार? पाहा संपूर्ण शेड्यूल

युवा बुद्धिबळपटूंकडे लक्ष

11 वर्षांखालील मुलांच्या गटात यजमान शाळेचा अव्वल मानांकित लक्ष दिघे, तर मुलींच्या गटात त्वेषा जैन यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सात वर्षांखालील गटात इवान दुबे आणि लिया कृष्णन यांना अग्रमानांकन मिळाले आहे.

काही अनपेक्षित निकाल आणि बरोबरीचे डाव वगळता पहिल्या फेरीत मानांकित खेळाडूंचाच दबदबा राहिला. आंतरराष्ट्रीय पंच पी. बी. भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सुरू आहे. दुसऱ्या फेरीत आघाडीच्या बुद्धिबळपटूंची खरी कसोटी लागणार असून, पुढील फेऱ्यांतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.

Cricket News: पुणे कॉर्पोरेट क्लॅशमध्ये TCS चा चौकार! सलग चौथ्या विजयासह स्पर्धेत दबदबा कायम

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कोणाची विजयी सुरुवात झाली?

    Ans: राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या मायशा परवेझने विजयी सुरुवात केली.

  • Que: मायशा परवेझने कोणत्या गटात विजय मिळवला?

    Ans: मायशाने 15 वर्षांखालील मुलींच्या गटात अनन्या जयदीप धमालवर मात केली.

  • Que: बुद्धिबळ स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे?

    Ans: दहिसर पश्चिम येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Maisha parvez wins opening round maharashtra school chess championship rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • Chess Championship
  • Dahisar
  • SBI

संबंधित बातम्या

Chess Championship : महाराष्ट्रातील 800 युवा बुद्धिबळपटूंचा महासंग्राम! बुधवारपासून राज्य अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात
1

Chess Championship : महाराष्ट्रातील 800 युवा बुद्धिबळपटूंचा महासंग्राम! बुधवारपासून राज्य अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात

SEBI Mutual Fund Rules 2026: Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून SEBI चा नवा नियम लागू
2

SEBI Mutual Fund Rules 2026: Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून SEBI चा नवा नियम लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.