Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! कोल्हापुरात लवकरच उभे राहणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम

राज्यात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याच्या शासनाच्या संकल्पाला या प्रकल्पामुळे बळ मिळणार असून, कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा परंपरेला नवी दिशा मिळण्यास मदत होईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2026 | 02:35 AM
क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! कोल्हापुरात लवकरच उभे राहणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार
कोल्हापूर आणि क्रीडा विभाग यांच्यात सामंजस्य करार
खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार

मुंबई: कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रिकेट असोसिएशन, कोल्हापूर आणि क्रीडा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे भविष्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, क्रीडा विभागाचे उप सचिव आबासाहेब कवळे, क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे तसेच जिल्हा क्रिकेट असोसीएशनचे कार्यकारिणी सदस्य रामचंद्र पाटणकर व पदाधिकारी ऋतुराज इंगळे, अभिजीत भोसले, मदन शेळके उपस्थित होते.

IND vs ZIM : भारताविरुद्ध झिम्बाब्वेची टीम तयार! T20 मालिकेसाठी संघ जाहीर, 3 खेळाडूंना डच्चू; अनुभवी खेळाडूची एन्ट्री

जागतिक दर्जाच्या सुविधा ही संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. येथे बॉक्सिंग, ज्युडो, आर्चरी, कुस्ती, जलतरण, टेबल टेनिस, फेन्सिंग आदी खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच क्रिकेट म्युझियम उभारण्यात येणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी येथील १२.७६ हेक्टर (३१.९० एकर) शासकीय जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व संबंधित क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य कराराअंतर्गत हस्तांतरित करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे व कोल्हापूर येथील क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील यांनी भाडेपट्टा करारनामा हस्तांतरणावर स्वाक्षरी केली.

बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसी (ICC)च्या निकषांनुसार सुमारे ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात आधुनिक पॅव्हेलियन, सराव मैदाने, इनडोअर प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, क्लब हाऊस, फ्लडलाइट व्यवस्था, क्रिकेट म्युझियम, खेळाडू व अधिकाऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी वाहनतळ, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प तसेच अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थाही उभारण्यात येईल.

David Warner अडचणीत! ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात दोषी; जेलची टांगती तलवार

राज्यात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याच्या शासनाच्या संकल्पाला या प्रकल्पामुळे बळ मिळणार असून, कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा परंपरेला नवी दिशा मिळेल. या स्टेडियममुळे जिल्ह्यातील क्रिकेटला चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होतील. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून क्रीडा पर्यटनाला प्रोत्साहन मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Cm devendra fadnavis agreement international standard cricket stadium will soon come up in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • kolhapur
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
1

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
2

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
3

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना
4

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.