Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: जैस्वालची वादळी खेळी अन् राहुलची संयमी साथ; भारताची ‘यशस्वी’ सुरुवात, दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया १५० पार

IND vs NZ 1st Test Day 2 Score: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर एक विकेट गमावून १५९ धावा केल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 20, 2026 | 01:45 PM
IND vs NZ 1st Test Day 2 Score

IND vs NZ 1st Test Day 2 Score

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडचे ३६८ धावांचे आव्हान
  • भारताची दमदार सुरुवात
  • दुसऱ्या दिवसअखेर १५९ धावा
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवशी, शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले.

बुमराहने सुरुवातीलाच न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडचा संपूर्ण संघ पहिल्या डावात ३६८ धावा करुन सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने आपल्या पहिल्या डावात १ विकेट गमावून १५९ धावा केल्या आहेत. केएल राहुल ५२ धावांवर आणि देवदत्त पडिक्कल १६ धावांवर नाबाद होता. पहिल्या डावातील एकूण धावसंख्येनुसार भारत आता २०९ धावांनी पिछाडीवर आहे.

SA vs BAN: WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! बांग्लादेशला लोळवत दक्षिण आफ्रिकेची अव्वलस्थानी झेप; टीम इंडिया कितव्या स्थानावर?

भारतीय संघाची उत्कृष्ट गोलंदाजी

पहिल्या दिवशी भारतीय संघाने चांगली गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच किवींना मोठा धक्का दिला. एका टप्प्यावर न्यूझीलंडची धावसंख्या पाच विकेट्स गमावून ७० धावांवर होती. त्यानंतर हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी सूत्रे हाती घेतली. हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात एक भक्कम धावसंख्या उभारली. पहिल्या दिवशी न्यूझीलंडने ८२ षटकांत पाच विकेट्स गमावून २४३ धावा केल्या.

दुसऱ्या दिवशी, न्यूझीलंडने २४३ धावांवर पाच गडी बाद असताना आपला डाव पुन्हा सुरू केला. निकोल्सने एक बाजू सांभाळून धरली आणि फिलिप्सने आपले शतक पूर्ण केले. फिलिप्स आणि निकोल्स यांनी सहाव्या विकेटसाठी २१६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. परंतु, दुसऱ्या सत्रात, प्रसिद्धने नॅथन स्मिथला १४ धावांवर , आकाश दीपने जेमिसनला ११ धावांवर आणि बुमराहने हेन्रीला १ धावावर बाद केले.

अखेरीस, अंशुल कंबोजने जेकब डफीला बाद करून न्यूझीलंडचा डाव संपवला. फिलिप्स आणि निकोल्सच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडला ३६८ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत झाली. टीम इंडियाकडून बुमराहने सर्वाधिक चार विकेट्स घेतले. आकाशदीपने तीन, अंशुल कंबोजने दोन आणि प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतला.

जैस्वाल- राहुलने केली यशस्वी सुरुवात

भारतीय संघाने आपल्या डावाची चांगली सुरुवात केली. सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. दोघांनीही सुरुवातीपासूनच वेगाने धावा केल्या. विशेषतः जैस्वाल चांगल्या लयीत होता. त्याने मैदानात शानदार फटकेबाजी केली. राहुलने एक बाजू सांभाळली आणि खराब चेंडूंवर सहज धावा केल्या.

सत्राच्या शेवटच्या टप्प्यात जैस्वाल ८९ चेंडूंमध्ये ८५ धावा करून बाद झाला. यशस्वीचे शतक हुकले, त्याने आपल्या खेळीत १६ चौकार मारले. तो बाद झाल्यानंतर भारताचा धावगतीचा वेग मंदावला. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी अर्धशतके झळकावून भारताला मजबूत स्थितीत आणले आहे. आता राहुल ५२ धावांवर आणि देवदत्त पडिक्कल १६ धावांवर क्रीजवर टिकून आहेत.

ENG vs AUS: कांगारूंना घरच्या मैदानावर लोळवलं! इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला दणका; मालिका जिंकत वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची धावसंख्या किती?

    Ans: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात १ विकेट गमावून १५९ धावा केल्या आहेत.

  • Que: न्यूझीलंडने पहिल्या डावात किती धावा केल्या?

    Ans: न्यूझीलंडचा पहिला डाव ३६८ धावांवर संपला. त्यामुळे भारत अजूनही २०९ धावांनी पिछाडीवर आहे.

  • Que: यशस्वी जैस्वालने किती धावा केल्या?

    Ans: यशस्वी जैस्वालने ८९ चेंडूंत ८५ धावांची वादळी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत १६ चौकार मारले.

Web Title: Ind vs nz 1st test day 2 score jaiswal kl rahul india 159 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • KL Rahul Captain
  • Test Series
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IND Vs NZ : राहुल-जैस्वाल यांची दमदार बॅटिंग सुरु; भारत पोहोचला शतकाच्या जवळ
1

IND Vs NZ : राहुल-जैस्वाल यांची दमदार बॅटिंग सुरु; भारत पोहोचला शतकाच्या जवळ

IND Vs NZ: जगज्जेता बुमराह! न्यूझीलंडच्या निकोलसने केले कौतुक; म्हणाला, ‘जसप्रीत बॉल दोन्ही…’
2

IND Vs NZ: जगज्जेता बुमराह! न्यूझीलंडच्या निकोलसने केले कौतुक; म्हणाला, ‘जसप्रीत बॉल दोन्ही…’

SA vs BAN: WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! बांग्लादेशला लोळवत दक्षिण आफ्रिकेची अव्वलस्थानी झेप; टीम इंडिया कितव्या स्थानावर?
3

SA vs BAN: WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! बांग्लादेशला लोळवत दक्षिण आफ्रिकेची अव्वलस्थानी झेप; टीम इंडिया कितव्या स्थानावर?

IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!
4

IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.