Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Siuuu… CR7 इज Back; उझबेकिस्तानविरुद्ध गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा FIFA World Cup 2026 मध्ये नवा जागतिक विक्रम

Cristiano ronaldo Goal Against Uzbekistan Creates History in FIFA World Cup 2026: फुटबॉलचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला आहे. सलग ६ विश्वचषकांमद्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 24, 2026 | 02:12 PM
Siuuu… CR7 इज Back; उझबेकिस्तानविरुद्ध गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा FIFA World Cup 2026 मध्ये नवा जागतिक विक्रम
Follow Us
Follow Us:
  • ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा चमकला
  • उझबेकिस्तानविरुद्ध गोल करत CR7 ने रचला इतिहास
  • ६ विश्वचषकांमध्ये केले गोल
पोर्तुगालचा संघ फिफा विश्वचषकात ( FIFA World Cup 2026) कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलांच्या जोरावर पोर्तुगालने उझबेकिस्तानचा ५-० असा पराभव केला. या सामन्यात रोनाल्डोने अगदी सुरुवातीच्या मिनिटांतच पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली आहे. रोनाल्डोने (Cristiano ronaldo) सहाव्या मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. फिफा विश्वचषकातील रोनाल्डोचा हा १०वा गोल होता. ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी हा एक ऐतिहासिक गोल असून, यासोबतच त्याने आपल्या नावावर एक विश्वविक्रमही नोंदवला आहे. सहा विश्वचषकांमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

FIFA World Cup 2026: ऑस्ट्रियाविरुद्ध ‘एक’ गोल अन् Lionel Messi रचणार इतिहास; ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार?

६ विश्वचषकांमध्ये गोल करणारा रोनाल्डो पहिला खेळाडू

पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो सहा विश्वचषकांमध्ये गोल करणारा जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. मंगळवारी (दि. २३ जून) रोजी उझबेकिस्तानविरुद्ध सामन्यात सहाव्या मिनिटाला गोल करून त्याने हा विक्रम केला. ४१ वर्षीय रोनाल्डोने २०१०, २०१४, २०१८, २०२२ आणि आता आपल्या सहाव्या विश्वचषक स्पर्धेत गोल करून इतिहास रचला. यापूर्वी कोणत्याही पुरुष फुटबॉलपटूला सलग सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करता आले नव्हते. सहा विश्वचषकांमध्ये गोल करून त्याने अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे. मेस्सीने ( Lionel Messi) २००६, २०१४, २०१८, २०२२ आणि २०२६ च्या विश्वचषकांमध्ये गोल केले आहेत. मात्र, २०१० च्या विश्वचषकात त्याला गोल करता आला नाही. ह्यूस्टन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पोर्तुगालने उझबेकिस्तानचा ५-० ने पराभव केला.

या गोलमुळे रोनाल्डो फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पोर्तुगालचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. त्याने या बाबतीत युसेबियोची बरोबरी केली आहे. १९६६ च्या विश्वचषकात युसेबियोने एकूण ९ गोल केले होते. तर दुसरीकडे, रोनाल्डोने आता पोर्तुगालसाठी १० गोल करून या बाबतीत युसेबियोला मागे टाकले आहे. रोनाल्डोने हे गोल २००६ ते २०२६ च्या विश्वचषकांदरम्यान केले आहेत.

पोर्तुगालचा उझबेकिस्तानवर दणदणीत विजय

रोनाल्डोने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. रोनाल्डोने सहाव्या मिनिटात गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. रोनाल्डोने आपली प्रभावी कामगिरी सुरूच ठेवली आणि पहिल्याच हाफमध्ये आपला दुसरा गोल केला. रोनाल्डोने ३९ व्या मिनिटाला एक शानदार गोल करून संघाला उझबेकिस्तानविरुद्ध ३-० अशी आघाडी मिळवून दिली. नुनो मेंडेसने १७ व्या मिनिटाला पोर्तुगालसाठी दुसरा गोल केला. पहिल्या हाफच्या समाप्तीपूर्वी काही सेकंद आधी रोनाल्डो आपला तिसरा गोल करण्याच्या अगदी जवळ होता, पण त्याची संधी हुकली.
दुसऱ्या हाफमध्ये, उझबेकिस्तानच्या अब्दुखोदिर खुसानोव्हने केलेल्या आत्मघाती गोलमुळे पोर्तुगालला ४-० अशी आघाडी मिळाली. पोर्तुगालच्या ब्रुनो फर्नांडिसने कॉर्नर किक मारली आणि गोलपोस्टजवळ उभ्या असलेल्या खुसानोव्हच्या डोक्याला लागताच चेंडू गोलपोस्टच्या बाहेर गेला. यानंतर, पोर्तुगालने पाचवा गोल करून उझबेकिस्तानविरुद्ध आपली आघाडी अधिक मजबूत केली. ८७ व्या मिनिटाला राफेल लिओने पोर्तुगालसाठी पाचवा गोल केला. सामन्याच्या अखेरपर्यंत उझबेकिस्तानचा संघ एकही गोल करू शकला नाही.

I am Back..

सामन्यानंतर रोनाल्डो म्हणाला, I m Back ‘मी परत आलो आहे’. मागील सामन्यात रोनाल्डोला गोल करता आला नव्हता, पण या सामन्यात त्याने दमदार कामगिरी करण्यात यश मिळवले. उझबेकिस्तान संघाचा प्रवास गट फेरीतच थांबला. रोनाल्डो व्यतिरिक्त, नुनो मेंडेस आणि राफेल लिओने पोर्तुगालसाठी प्रत्येकी एक गोल केला.

FIH Nations Cup 2026: चक दे इंडिया! न्यूझीलंडला नमवत भारतीय रणरागिणींनी रचला इतिहास, FIH Nations Cup वर कोरलं नाव

Web Title: Cristiano ronaldo world record portugal vs uzbekistan fifa world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo
  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस
1

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस

Lionel Messi Birthday: फुटबॉलच्या ‘अल्टिमेट किंग’चा वाढदिवस, 39 व्या वर्षीही करतोय तुफान रेकॉर्ड्स; जादू कायम
2

Lionel Messi Birthday: फुटबॉलच्या ‘अल्टिमेट किंग’चा वाढदिवस, 39 व्या वर्षीही करतोय तुफान रेकॉर्ड्स; जादू कायम

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?
3

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?

FIFA World Cup 2026: Lionel Messi चा रेकॉर्ड, वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू, मिरोस्लाव क्लोजचा रेकॉर्ड तुटला
4

FIFA World Cup 2026: Lionel Messi चा रेकॉर्ड, वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू, मिरोस्लाव क्लोजचा रेकॉर्ड तुटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.