Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs DC: मराठमोळ्या आयुष म्हात्रेची हाफसेंच्युरी, तर सॅमसनची शतकी खेळी; अखेर चेन्नईने फोडली डरकाळी

चेन्नईने आज तुफान खेळी करत IPL 2026 मध्ये आपण आहोत हे दाखवून दिले. संजू सॅसमन आणि आयुष म्हात्रेच्या तुफान खेळीने दिल्ली कॅपिटल्सला चांगलेच हादरवले आहे. संजूने आपले चौथे शतक पूर्ण केले.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 11, 2026 | 09:03 PM
चेन्नई सुपर किंग्जच्या संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रेची तुफान खेळी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

चेन्नई सुपर किंग्जच्या संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रेची तुफान खेळी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • संजू सॅमसनचे जोरदार शतक 
  • सीएसकेची दमदार खेळी
  • आयुष म्हात्रेने पूर्ण केले अर्धशतक 
आज, आयपीएल २०२६ मधील दुहेरी सामन्यांपैकी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. हा सामना चेन्नईतील सीएसकेच्या घरच्या मैदानावर, एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून यजमानांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 

याच गोष्टीचा फायदा उचलून संजू सॅमसन आणि मराठमोळ्या आयुष म्हात्रेने कमालीचा खेळ दाखवत १०० धावांची भागीदारी केली आणि संजूने आपले शतक पूर्ण करत चेन्नईच्या प्रेक्षकांना खुष केले. तर आयुष म्हात्रेनेही आपले अर्धशतक पूर्ण करत आज मोठा वाटा उचलला आहे. संजूने आपला फॉर्म पुन्हा दाखवत या सामन्यात सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. 

CSK Vs DC Live: दिल्लीचे ‘धुरंदर’ चेन्नईवर भारी ठरणार की…; अक्षर पटेलने घेतला ‘हा’ निर्णय

पहिला विजय मिळण्याच्या प्रतिक्षेत सीएसके

कॅपिटल्सने आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या आकिब नबीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे, तर देवाल्ड ब्रेविसने सुपर किंग्सच्या संघात पुनरागमन केले आहे. सीएसकेनेही संघात आणखी बदल करत मॅट हेन्रीच्या जागी गुर्जपनीत सिंगला संधी दिली आहे. चेन्नई सुपर किंग्स आज या हंगामातील आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईने आतापर्यंत आपले तिन्ही सामने गमावले आहेत. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्याकडून सीएसकेला पराभव पत्करावा लागला आहे. सीएसके गुणतालिकेत तळाशी आहे. दुसरीकडे, दिल्लीने आपल्या तीनपैकी दोन सामने जिंकून चौथे स्थान पटकावले आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने लखनौ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्सला पराभूत करून हंगामाची दमदार सुरुवात केली, पण तिसऱ्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. आता, दिल्ली संघ पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.

दिल्लीविरूद्ध येणार का CSK चा वाघ MSD? कोच फ्लेमिंगने दिली रिकव्हरीवर अपडेट

आयुष म्हात्रेची हाफसेंच्युरी 

आयुष म्हात्रेने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने २७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. टी. नटराजनच्या गोलंदाजीवर षटकार मारून त्याने ५० धावांचा टप्पा ओलांडला. आयुष आणि सॅमसन यांनी आता शतकी भागीदारी केली असून, त्यामुळे सीएसकेची धावसंख्या चांगली उभारली जाण्याची शक्यता निर्माण झाली.

संजू सॅमसनची कमालीची शतकी खेळी

अप्रतिम फटकेबाजी आणि कमालीचा खेळ दाखवत संजू सॅमसनने आपले शतक पूर्ण केले आहे. वर्ल्ड कपपासून कमालीचा फॉर्म असणारा संजू सॅमसन हा आज मैदानात शतक पूर्ण करण्याच्या हेतूनेच मैदानात उतरला असल्याचे त्याच्या फटकेबाजीवरून दिसून आले. त्याला एक जीवनदान मिळाले आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा उचलला. दिल्ली कॅपिटल्सला संजूची ही खेळी महाग तर ठरणार नाही ना? असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे. चेन्नईने आज आपला पहिला सामना जिंकण्याच्या उद्देशाने खेळ खेळला असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Csk vs dc ipl 2026 sanju samson completed 100 and youngster ayush mhatre half century roared in chennai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Aayush Mhatre
  • CSK vs DC
  • IPL 2026
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11
1

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report
2

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत
3

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत

IND VS WI: काय पण करा, पोरं नाय ऐकणार! Sanju अन् Shreyas ने लोळवलं, विंडीजला विजयासाठी…
4

IND VS WI: काय पण करा, पोरं नाय ऐकणार! Sanju अन् Shreyas ने लोळवलं, विंडीजला विजयासाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.