Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs RCB : विराट कोहलीला बाद करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सकडे मास्टर प्लान! या त्रिकुटाला म्हणतात विजयाची गुरुकिल्ली

आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ७ सामन्यांमध्ये खूप उत्साह होता, पण आजचा सामना, म्हणजेच २८ मार्च, खूप खास आहे कारण आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 28, 2025 | 04:26 PM
फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये काही तासांमध्ये महामुकाबला सुरु होणार आहे. यासाठी सगळेच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. सोशल मीडियावर यासंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. आजचा सामना फारच मनोरंजक असणार आहे. आजच्या सामन्यांमध्ये कोणता खेळ विजय मिळवणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या बंगळुरूच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीने कमालीची कामगिरी केली होती. दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या सामन्यानंतर नाबाद आहेत त्यामुळे आजच्या सामन्यांमध्ये विजयाच्या उद्देशाने दोन्ही संघ मैदानात उतरतील.

आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ७ सामन्यांमध्ये खूप उत्साह होता, पण आजचा सामना, म्हणजेच २८ मार्च, खूप खास आहे कारण आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांचे चाहते खूप मोठे आहेत त्यामुळे सामन्याची मजा द्विगुणीत होणार आहे. एकामागून एक महान दिग्गज मैदानात उतरतील. हा सामना चेन्नईचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे, या मैदानावर यलो आर्मीचा वरचष्मा आहे.

IPL 2025 : हरभजनच्या शाळेत विलियम्सनची भरती! हिंदी ऐकून ‘गुरू’ भज्जी लोटपोट, Hi मैं केन मामा…, Video Viral

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गेल्या १६ वर्षांत आरसीबीला येथे एकही सामना जिंकता आलेला नाही. एकूण ९ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी आरसीबीने फक्त एकच सामना जिंकला होता, तोही २००८ मध्ये. आज जेव्हा दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील तेव्हा सर्वांच्या नजरा चेन्नई संघाच्या त्रिकुटावर असतील, जो या हंगामात या संघासाठी विजयाची हमी मानला जात आहे.

चेपॉकची फिरकीला अनुकूल खेळपट्टी लक्षात घेता, चेन्नईचे तीन फिरकीपटू – रविचंद्रन अश्विन, नूर अहमद आणि रवींद्र जडेजा हे आरसीबीवर कहर करू शकतात. हे सीएसके संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. चेन्नईचे हे तीन फिरकीपटू सामन्याचा मार्ग बदलू शकतात. या तिघांच्या १२ षटकांचा खेळ हा आरसीबीसाठी धोक्याचा इशारा आहे. हे चेन्नईच्या विजयाचे गमक ठरू शकते.

𝗥𝗖𝗕 𝘃𝘀 𝗖𝗦𝗞: 𝗧𝗵𝗲 𝗨𝗹𝘁𝗶𝗺𝗮𝘁𝗲 𝗳𝗮𝗻 𝗽𝗿𝗲𝘃𝗶𝗲𝘄! ⚔

🎥 Join our 12th Man Army as they predict the defining factors, and which RCB player will have a massive role to play in the #CSKvRCB game tonight!

Here’s what they had to say, only on @BigBasket_Com… pic.twitter.com/Jldtm9dg9X

— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 28, 2025

रवींद्र जडेजा हा डावखुरा स्टार अष्टपैलू खेळाडू २०१२ पासून चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. चेपॉकच्या खेळपट्टीवर जडेजाची मजबूत पकड आहे. अफगाणिस्तानचा डावखुरा मनगटाचा फिरकीपटू नूर अहमदला मेगा लिलावात चेन्नईने १० कोटी रुपयांना खरेदी केले. या खेळाडूने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सवर कहर केला. त्याने ४ षटकांत १८ धावा देत ४ बळी घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला रविचंद्रन अश्विन त्याच्या कॅरम बॉल आणि अनुभवासाठी प्रसिद्ध आहे. आरसीबीविरुद्ध त्याचे चार षटके निर्णायक ठरू शकतात. अश्विनला चेन्नईने ९.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. तो घरी परतला आहे.

Web Title: Csk vs rcb chennai super kings have a master plan to dismiss virat kohli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • CSK vs RCB
  • R Ashwin
  • Ravindra Jadeja
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू कोणते? कोहली किंवा पॉन्टिंग नाही तर हा भारतीय नंबर 1
1

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू कोणते? कोहली किंवा पॉन्टिंग नाही तर हा भारतीय नंबर 1

 भारताच्या ‘या’ स्टार फिरकीपटूची ICC ODI RANKING मध्ये घसरण: तर जडेजा टॉप १० मध्ये
2

 भारताच्या ‘या’ स्टार फिरकीपटूची ICC ODI RANKING मध्ये घसरण: तर जडेजा टॉप १० मध्ये

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे
3

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
4

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.