ऑस्ट्रेलियाचा अव्वल क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियात चांगलाच अक्टिव्ह असून तो इन्स्टाग्राम व्हिडीओज आणि ट्विट्समधून तो मैदानाबाहेरही चाहत्यांसह मनोरंजन करीत असतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियातच नव्हे तर क्रिकेट खेळणाऱ्या जगातल्या इतर देशातही वॉर्नरचे जबरा फॅन्स आहेत. मात्र हाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटन पटू पी व्ही सिंधू हीच फॅन झाला आहे.
पी व्ही सिंधूने बॅडमिंटन स्पर्धेत मिळवलेल्या सुवर्ण यशानंतर डेव्हिड वॉर्नर याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पी व्ही सिंधूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे सिंधूचा पदक स्वीकारल्यानंतरचा फोटो वॉर्नरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत खाली कॅप्शन देत त्यानं सिंधूचं कौतुक केले आहे. वॉर्नरच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर आतापर्यंत साडेपाच लाख लाईक्स मिळाले आहेत. इतकच नव्हे तर डेव्हिडची पत्नी कँडिस वॉर्ननही कमेंट करत ‘खूप छान’ असं म्हटलं आहे.
राष्ट्रकुलमध्ये सिंधूची ‘सुवर्ण कामगिरी ’
बर्मिंगहॅममध्ये स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्णपदकं पटकावली. सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत आपला दबदबा कायम राखताना महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या मिशेल लीचं आव्हान मोडीत काढलं. सिंधूनं ही फायनल २१-१५, २१-१३ अशी जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं आपलं पहिलं सुवर्णपदक पटकावलं.
त्याआधी २०१४ साली सिंधून पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं. पण २०१८ साली गोल्ड कोस्टमध्ये सिंघूनं एक पाऊल पुढे टाकले. गोल्ड कोस्टमध्ये सिंधूचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं. फायनलमधल्या पराभवामुळे तिला रौप्यपदक मिळालं. पण बर्मिंगहॅममध्ये तिचं सोनेरी यशाचं स्वप्न अखेर साकार झालं.