DC vs LSG: Delhi Capitals win the toss and elect to bowl; Rishabh Pant will bat first.
DC vs LSG : 18 व्या हंगामातील चौथा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर दिल्ली कपिटल्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. दोन्ही संघांचा या मोसमातील हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघात विजयी सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील पहिला सामना आहे. यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करणार आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचं संघाची धुरा स्टार फलंदाज ऋषभ पंतकडे आहे.
विशाखापट्टणमधील डॉ वायएस राजशेखरा रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
हेही वाचा : पहा Video : धोनीचा जलवा कायम, मैदानात एंट्री होताच नीता अंबानींना झाकावे लागले कान..
दिल्ली कॅपिटल्स संघ
दिल्ली कॅपिटल्स संघ : अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, करुण नायर, मोहित शर्मा, दुष्मंथा चमीरा, अजय जाधव मंडल, दर्शन नळकांडे, समीर रिझवी, डोनोवन फरेरा, त्रिपुराण विजय, मानवंथ कुमार एल, विपराज निगम आणि माधव तिवारी.
हेही वाचा : IPL 2025 : CSK संघात रिंग मास्टर कोण? थालाने तोडली चुप्पी..; म्हणाला ‘मी फक्त सल्ला..’
लखनौ सुपर जायंट्स संघ
लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.
इंडियन पॉसिबल लीग २०२५ चा महामुकाबला काल पार पडला. यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. कालचा सामना हा चेन्नईच्या होम ग्राऊंडवर चेपॉक येथे झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिला सामना गमावला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पहिले सामन्यामध्ये मुंबईला ४ विकेट्सने पराभूत केले. यामध्ये सलामीवीर फलंदाज रचिन रवींद्र आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने कमालीचा खेळ दाखवला.