एमएस धोनी (फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात झाली आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली आहे. सीएसकेने एमआयचा पराभव करत पहिल्या समान्याची सुरवात विजेयाने केली. चेन्नई सुपर किंग्जमध्ये स्टार अनकॅप्ड खेळाडू धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसत आहे. मुंबईविरुद्ध 4 गडी राखून विजय मिळवल्यानंतर धोनीने सामन्यादरम्यान मैदानावरील निर्णय कोण घेत असतं? याबाबत हे स्पष्ट केले आहे. विजयानंतर धोनीने कर्णधार ऋतुराजबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
महेंद्रसिंग धोनी सहज व्यक्त होत नाही. मात्र, पहिल्या सामन्यानंतर धोनी म्हणाला की, कर्णधार म्हणून ९९ टक्के निर्णय ऋतुराज गायकवाड घेत असतो. जिओहॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, पाच वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधाराने सांगितले की, तो गायकवाडांना वेळोवेळी आपल्या सूचना देत असतो. याचा अर्थ ते असा नाही की, त्या सूचना अमलात आणाव्यात असे काही नाही. धोनी म्हणाला की, मी फक्त सल्ला देतो, माझा सल्ला त्याच्यावर लादत नाही.
गेल्या हंगामात एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले होते यानी ऋतुराजकडे संघाची धुरा सोपविली होती. धोनी म्हटलं की, रुतुराज गायकवाड याने पदभार स्वीकारला यानी तोच 99 टक्के निर्णय घेत असतो. काही निर्णयांमध्ये धोनी सहकार्य करतो, मात्र बहुतांश निर्णय त्याचेच असतात. धोनी म्हणाला की, रुतुराज हा आमच्या टीमचा बराच काळ भाग राहिला आहे. त्याचा स्वभाव खूप चांगला आहे, तो खूप शांत आहे तसेच खूप सहनशील देखील आहे. त्यामुळेच त्याची आम्ही कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
धोनी पुढे म्हणाला की, टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी मी ऋतुराजला असंही म्हटलं होतं की, मी तुला सल्ला दिला तर त्याचा अर्थ असा नाही की तो पाळलचा पाहिजे. मी शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करेन. मी पडद्याआडून निर्णय घेत असतो असा अनेकांचा गैरसमज आहे. पण खरे तर गायकवाड याचेच सर्व निर्णय असतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत धोनीचे चांगले संबंध आहेत. धोनी म्हणाला की, त्यांच्या नात्याचे रूपांतर गेल्या काही वर्षात मैत्रीत झाले आहे. तसेच तो म्हणाला की, सुरुवातीला हे नाते कर्णधार आणि युवा खेळाडूचे होते, परंतु कालांतराने आम्ही खूप चांगले मित्र झालो आहोत. आता आम्ही दोघे देखील कर्णधार नसल्याने आम्हाला सामन्यापूर्वी बोलण्यासाठी जास्त वेळ मिळतो.