पहा Video : धोनीचा जलवा कायम, मैदानात एंट्री होताच नीता अंबानींना झाकावे लागले कान..(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 चा हंगाम सुरू झाला आहे. आयपीएलचा हा 18 वा हंगाम आहे. या हंगामातील तिसरा सामना गेल्या रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबईने इन्डियन्सने चेन्नई सुपर किंग्सला 156 धावांचे लक्ष्य दिले होते. चेन्नई संघाने मुंबई इंडियन्सने दिलेले हे लक्ष्य 19.1 षटकांत पूर्ण करून विजय नोंदवला. या सामन्यात विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीची जास्त चर्चा झालेली दिसून आली आहे.
महेंद्रसिंग धोनीचे वय सध्या ४४ वर्षे आहे. वयाच्या या टप्प्यावर देखील धोनीच्या फिटनेस कोणत्याही युवा खेळाडूपेक्षा अधिक चांगला दिसून येतो. क्षेत्ररक्षण करताना त्याने आपल्या अप्रतिम विकेटकीपिंग कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर, जेव्हा तो शेवटी फलंदाजीसाठी आला तेव्हा तो क्षण मात्र डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असाच होता.
हेही वाचा : IPL 2025 : CSK संघात रिंग मास्टर कोण? थालाने तोडली चुप्पी..; म्हणाला ‘मी फक्त सल्ला..’
महेंद्रसिंग धोनीसाठी चाहत्यांचा उत्साह पूर्वी इतका आज देखील ताजाच आहे. धोनीच्या मैदानावरील एंट्रीसाठी चाहते नहेमी आतुर झालेळे असतात. मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नेमके हेच बघायाला मिळाले. यावेळी धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा चाहत्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. या सामन्यात धोनीच्या प्रवेशानंतर चाहत्यांचा आवाज 125 डेसिबलपर्यंत जाऊन पोहोचला. यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनाही आपले कान झाकून ठेवावे लागले.
Nita Ambani ji closing her ears during MS Dhoni’s entry 🥶🔥 pic.twitter.com/lPtCJYh2Kw
— ` (@WorshipDhoni) March 24, 2025
चेन्नईतून एम.ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा संपूर्ण स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्यावेळी संपूर्ण मैदान ‘थाला’च्या नावाने गुंजू लागले होते. धोनी ज्या ठिकाणी मैदानात उतरला होता त्याच्या शेजारीच नीता अंबानी आणि त्यांची मुले देखील बसळले होते. चाहत्यांच्या गोंगाटामुळे नीता अंबानी यांना चक्क कान झाकावे लागले. धोनीचा हा एंट्रीचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.
कल वाले क्रिकेट मैच में एक अजीब घटना हुई जो कि बताती है कि लोग धोनी के लिए कितने पागल हैं।
कल जब धोनी बैटिंग करने आ रहे थे तो नीता अंबानी उनसे कुछ ही दूरी पर बैठी हुईं थीं,
जैसे ही धोनी मैदान में उतरे वैसे ही सारे स्टेडियम में तगड़ा शोर होने लगा जिसके बाद नीता अंबानी ने अपने… pic.twitter.com/YariNLTwdH
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) March 24, 2025
आता सोशल मीडियावर धोनीच्या या व्हिडिओवर यूजर्स आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. कोणी याला धोनीची क्रेझ म्हणत आहेत तर कोणी धोनीबद्दलच्या चाहत्यांचे वेड देखील म्हणत असल्याचे दिसत आहे. या सामन्यात धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरला, मात्र त्याला फलंदाजीची संधी मिळालीच नाही.