RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये काल म्हणजेच 28 मार्चला चेपॉक स्टेडियमवर सामना खेळवला गेला. या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाला आरसीबीने 50 धावांनी पराभवाची धूळ चारलीअ आहे. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. या सामन्यात चेन्नईची कामगिरी खूपच निराशाजनक झाली आहे. आरसीबीने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर तब्बल 17 वर्षांनंतर पराभूत केले आहे. या सामन्यादरम्यान असे काही घडले की, ज्यानंतर धोनीची जादू संपल्यागत जमा झाल्याचे बोलले जात आहे. तर विराट सिस्टिमचा उदय झाल्याचे म्हटले जात आहे.
महेंद्रसिंग धोनी जेव्हा जेव्हा रिव्ह्यू घेतो तेव्हा तो 99 टक्के बरोबर असल्याचे कित्येकदा समोर आले आहे. म्हणून डिआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टीम असे देखील म्हटले जाऊ लागले. पण, या सामन्यात मात्र असे काही चित्र दिसून आले नाही. या सामन्यात धोनीची रिव्ह्यू सिस्टीम अपयशी ठरल्याचे दिसून आले. मात्र, रिव्ह्यू घेण्याच्या बाबतीत विराट कोहली मात्र यशस्वी झाला आहे.
हेही वाचा : CSK vs RCB : ‘त्या’ दोन बाऊन्सरवर दोन दिग्गजांचा संताप, खेचले षटकारानंतर षटकार, केली गोलंदाजांची धुलाई..
नेमके घडले असे की, आरसीबीच्या डावाच्या तिसऱ्या षटकात खलील अहमदचा चेंडू विराट कोहलीच्या पॅडला लागला आणि खलीलला वाटले की तो एलबीडब्ल्यू आऊट होणार आहे. त्याआधी मैदानावरील पंचांनी त्याला नॉट-आउट दिले आणि काही चर्चेनंतर धोनीने कर्णधार रुतुराज गायकवाडला डीआरएस रिव्ह्यू घेण्याचा इशारा केला. परंतु यावेळी धोनीचा अंदाज चूक ठरला आणि रिव्ह्यू गमवावा लागला.
Ye Hai Dhoni Review System 🫣 #DRS@ChennaiIPL @RCBTweets pic.twitter.com/n5IWUfz29M
— Râvî Ràj ẞíñgh 🚩 (@GamerRavi9) March 28, 2025
चेन्नईची फलंदाजी सुरू असताना भुवनेश्वर कुमार डावातील पाचवे षटक टाकत होता. रचिन रवींद्र आणि दीपक हुडा हे दोघे क्रीजवर उपस्थित होते. भुवनेश्वर कुमारचा तिसरा चेंडू दीपक हुडाच्या बॅटला लागला. यष्टिरक्षक जितेश शर्माला त्यावेळी काहीच कळले नाही. भुवनेश्वर कुमार देखील यापासून अनभिज्ञच राहिला. पण स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रजत पाटीदारला काही आवाज आल्याचे जाणवले. त्याने हलके आवाहन केले आणि अंपायरने नाही म्हणत मान हलवली.
हेही वाचा : IPL 2025 : CSK चा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी; धोनीमुळे हा दिवस आला..! सोशल मीडियावर राडा..
हा प्रकार घडत असताना पाटीदारने कोहलीच्या दिशेने नजर टाकली आणि विराटने रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिले. त्यानंतर पाटीदारने रिव्ह्यूची मागणी केली. स्निकोमीटरवर बॉल बॅटच्या काठाने जितेशच्या ग्लोव्हजपर्यंत पोहोचल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यानंतर पंचांना आपला निर्णय बदलावा लागला आणि दीपक हुडाला तंबूच्या दिशेने जावे लागले.