एम एस धोनी(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 हंगामा चांगलाच रंगू लागला आहे. अशातच 8 वा सामना शुक्रवारी चेपॉक वर खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईच्या एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने भिडले होते. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत सीएसकेसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, चेन्नई सुपर किंग संघ पाठलाग करण्यात अपयशी ठरला आणि तो संघ 146 धावांपर्यंत मजल मारू शकला. याचा परिणाम सीएसकेला सामना 50 धावांनी गमवावा लागला. सुपर किंग्जच्या या दारुण पराभवामुळे चाहते खूप निराश झाले आहेत. त्यामुळे त्यांनी माजी कर्णधार एमएस धोनीवर जोरदार टीका करायला सुरवात केली आहे.
धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजीची स्थिती अत्यंत वाईट झाली होती. दुसऱ्याच षटकात राहुल त्रिपाठीच्या स्वरूपात पहिला झटका बसल्यानंतर संघाने ठराविक अंतराने आपल्या विकेट्स गमावल्या. रचिन रवींद्रन वगळता (41 धावा) इतर कुणालाही चेन्नईला चांगली सुरुवात करून देण्यास अपयश आले यानी चेन्नई गेममधून बाहेर पडली.
हेही वाचा : RCB vs CSK : 17 वर्षांनंतर कोण ठरला CSK च्या पराभवाचा खलनायक? ऋतुराज गायकवाडने मांडली सारीच व्यथा..
चेन्नई सुपर किंग्स संघाचा मोठा चाहता वर्ग आहे. आरसीबीविरुद्ध चेन्नईचा झालेला पराभव चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या संघाच्या अपयशासाठी चाहत्यांनी माजी कर्णधार एमएस धोनीलाच जबाबदार धरले आहे. वास्तविक पाहता सुपर किंग्जने 97 धावांवर आपल्या 7 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर धोनी फलंदाजीला येईल आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहचवेल असे चाहत्यांना वाटत होते. पण वास्तवात असे झाले नाही आणि धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला मैदनात उतरला. मात्र, तोपर्यंत सामना सीएसकेच्या हातातून निसटला होता. धोनीने 16 चेंडूत ३० धावांची खेळी केली परंतु ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
हेही वाचा : IPL 2025 : MS Dhoni ने CSK साठी केला भीम पराक्रम, आपल्याच खास मित्राचा विक्रम मोडला
आयपीएल 2025 मधील 8 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये (दि. 28 मार्च) पडला. हा सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाला बंगळुरूकडून 50 धावांनी पराभूत व्हावे लागले. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. याआधी म्हणजे 2008 मध्ये आरसीबीने सीएसकेचा पराभव केला होता. आता मात्र चेन्नईचा बालेकिल्ला आरसीबीने उद्ध्वस्त करून टाकला आहे. आरसीबीच्या सात गड्यांच्या मोबदल्यात 196 धावा केल्या होत्या. रजत पाटीदारने अर्धशतक करत आरसीबीला 196 धावापर्यंत पोहचवले होते. प्रत्युत्तरात चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला आठ विकेट्स गमावत केवळ 146 धावाच करता आल्या. 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या मोसमानंतर चेपॉकमध्ये चेन्नईविरुद्ध आरसीबीचा हा पहिला विजय ठरला आहे.