Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हात गमावला, जिद्द नाही! महाराष्ट्राच्या दिलीप गावितने रचला इतिहास! CWG 2026 मध्ये जिंकले सुवर्णपदक

dilip gavit won gold medal in cwc glasgow 100m t 47 race: ग्लासगो येथील राष्ट्रकुल खेळ २०२६ चा सातवा दिवस भारतासाठी उत्तम ठरला, कारण पॅरा-ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या १०० मीटर टी४७ अंतिम फेरीत दिलीप गवीतने सुवर्णपदक जिंकले, तर मोहम्मद बासिलने रौप्यपदक पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 30, 2026 | 01:28 PM
हात गमावला, जिद्द नाही! महाराष्ट्राच्या दिलीप गावितने रचला इतिहास! CWG 2026 मध्ये जिंकले सुवर्णपदक
Follow Us
Follow Us:
  • दिलीप गावितने जिंकले गोल्ड
  • 100 मीटर T47 मध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी
  • कोण आहे दिलीप गावित
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल खेळांच्या (Commonwealth games 2026) ७ व्या दिवशी भारताने ऐतिहासिक कामिगिरी केली. भारताने पॅरा ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या १०० मीटर T47 अंतिम शर्यतीत सुवर्ण आणि रौप्य दोन्ही पदके जिंकण्यात यश मिळवले. दिलीप महादू गावितने पुरुषांच्या १०० मीटर T47 प्रकारात १०.७१ सेकंदांचा विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक जिंकले. तर मोहम्मद बासिल मोरसिंघनकथने १०.८३ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. यासह भारताच्या खात्यात एकूण तीन सुवर्णपदकांची भर पडली असून, पदकांची एकूण संख्या १५ झाली आहे. पुरुषांची १०० मीटर T47 ही स्पर्धा शारीरिक अपंगत्व असलेल्या किंवा एक हात नसलेल्या खेळाडूंसाठीची एक पॅरा-ॲथलेटिक्स स्प्रिंट स्पर्धा आहे.

विराट कोहलीची RCB सुपरहिट! विक्रमी ब्रँड व्हॅल्यूने क्रिकेटविश्वात रचला जागतिक इतिहास

दिलीप गावितची सुवर्ण कामगिरी

पॅरा-ॲथलीट दिलीप गावितने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर T47 प्रकारात सुवर्णपदक जिंकून एक मोठा टप्पा गाठला. या स्पर्धेत पॅरा-ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. शर्मिलानंतर, दिलीप गावित आता पॅरा-ॲथलेटिक्समधील सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय पॅरा-ॲथलीट ठरला आहे. दिलीपने १०.७१ सेकंदात शर्यत पूर्ण करून या हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवली. २०२३ च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये, त्याने ४०० मीटर T47 प्रकारात चौथे स्थान मिळवले. या कामगिरीच्या जोरावर तो पॅरिस पॅरालिम्पिक्स आणि आशियाई पॅरा खेळांसाठी पात्र ठरला. हांगझू आशियाई पॅरा खेळांमध्ये, त्याने ४०० मीटर T47 प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताला ऐतिहासिक १०० वे पदक मिळवून दिले.

कोण आहे दिलीप गावित

दिलीप महाराष्ट्रातील नाशिकजवळच्या तोरण डोंगरी गावचा रहिवासी असून, तो एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. त्याने आपले बालपण शेतात आई-वडिलांना मदत करत घालवले. त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की, हाच मुलगा एके दिवशी देशासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवेल.लहानपणी, झाडावरुन पडल्याने दिलीपच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. योग्य उपचारांच्या अभावामुळे, हळूहळू, जखमेत गँगरीन पसरले, ज्यामुळे डॉक्टरांना त्याचा कोपराखालील हात कापावा लागला.

दिलीपची जिद्दीसमोर परिस्थितीही हारली

हात गमावल्यानंतरही दिलीपचा आत्मविश्वास कमी झाला नाही. कोणत्याही आधुनिक सुविधांशिवाय, गावातील कच्च्या रस्त्यांवर रोज सराव करत त्याने धावायला सुरुवात केली. ॲथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनीच सर्वप्रथम त्याची प्रतिभा ओळखली. काळे यांनी केवळ त्याची प्रतिभा ओळखलीच नाही, तर त्याच्या कुटुंबालाही मुलाला खेळात संधी देण्यासाठी राजी केले. सुरुवातीच्या काळात, त्यांनी दिलीपच्या प्रशिक्षणाची, राहण्याची आणि इतर खर्चाची जबाबदारीही स्वीकारली.

क्रिकेट वर्तुळात खळबळ! आंतरराष्ट्रीय अनुभवाचा ‘झिरो’ ठप्पा? तरीही ‘हा’ खेळाडू Team India च्या कोचपदी

Web Title: Dilip gavit won gold medal cwg 2026 100m t47 india historic win in glasgow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Athletics
  • commonwealth games 2026
  • indian athletes
  • Indian Para Athletics

संबंधित बातम्या

शीतल देवीचा ‘सुवर्ण बाण’! World Archery Para Series मध्ये कझाकस्तानच्या तिरंदाजावर मात; शूट-ऑफमध्ये बाजी मारत पटकावलं गोल्ड
1

शीतल देवीचा ‘सुवर्ण बाण’! World Archery Para Series मध्ये कझाकस्तानच्या तिरंदाजावर मात; शूट-ऑफमध्ये बाजी मारत पटकावलं गोल्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.