Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy 2026: नॉर्थ झोन संघ जाहीर; Arshdeep Singh- Anshul Kamboj ला संघात स्थान, जम्मू-काश्मीरच्या खेळाडूकडे कर्णधारपद

North Zone Team Announced for Duleep Trophy 2026: भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा दुलीप ट्रॉफी २०२६ साठीच्या उत्तर विभागीय संघात समावेश करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद जम्मू आणि काश्मीरचा कन्हैया वधवानला सोपवण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 20, 2026 | 10:06 AM
Duleep Trophy 2026: नॉर्थ झोन संघ जाहीर; Arshdeep Singh- Anshul Kamboj ला संघात स्थान, जम्मू-काश्मीरच्या खेळाडूकडे कर्णधारपद
Follow Us
Follow Us:
  • दुलीप ट्रॉफीसाठी नॉर्थ झोन संघ जाहीर
  • अर्शदीप आणि अंशुल कंबोजचाही संघात समावेश
  • जम्मू-काश्मीरच्या खेळाडूकडे कर्णधारपद
दुलीप ट्रॉफी २०२६-२७ साठीच्या (Duleep Trophy 2026)  उत्तर विभागाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. निवड समितीने १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचाही उत्तर विभागाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. या हंगामात कन्हैया वाधवानकडे कर्णधारपदाची कमान सोपवण्यात आली आहे. तर, दिल्लीच्या यश धुलची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडू आयुष बडोनीलाही उत्तर विभागाच्या संघात स्थान मिळाले आहे. या स्पर्धेत उत्तर विभागाचा सलामीचा सामना ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभागाशी होईल.  २३ ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफी २०२६ ला सुरूवात होणार आहे.

भारताचा अपूर्ण नकाशा दाखवणे पडले महागात; लव्हलिनाच्या आक्षेपानंतर ग्लासगोतील रेस्टॉरंटचा यू-टर्न

अर्शदीप आणि अंशुल कंबोजचाही संघात समावेश

भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि अंशुल कंबोज यांचाही उत्तर विभागीय संघात समावेश केला आहे. अर्शदीप २०२५ च्या इंग्लंड दौऱ्यात भारताच्या कसोटी संघाचा भाग होता, पण त्याला अद्याप कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. राष्ट्रीय कसोटी संघातून वगळण्यात आल्यानंतर अंशुल कंबोजदेखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. दिल्लीचा युवा फलंदाज आयुष बडोनीला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे हा संघ मजबूत दिसत आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील सहा खेळाडूंना संघात स्थान

गेल्या हंगामात रणजी ट्रॉफी जिंकलेल्या जम्मू आणि काश्मीर संघाचे उत्तर विभागीय संघात वर्चस्व दिसत आहे. रणजी विजेत्या संघातील सहा खेळाडूंचा दुलीप ट्रॉफी संघात समावेश करण्यात आला आहे. कर्णधार वधावन व्यतिरिक्त, सलामीवीर कामरान इक्बाल, मधल्या फळीतील फलंदाज अब्दुल समद, डावखुरा फिरकी अष्टपैलू आबिद मुश्ताक आणि वेगवान गोलंदाज सुनील कुमार व युधवीर सिंग यांचाही संघात समावेश आहे.

पारस डोगरा बाहेर

अनुभवी फलंदाज पारस डोगराला यावेळी संघात स्थान देण्यात आले नाही. निवड समितीने तरुण खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. वेगवान गोलंदाज आकिब नबीला दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी भारताच्या श्रीलंका दौऱ्याच्या संघात समावेश करण्यात आला आहे. इंडिया ‘अ’ संघाचे नियमित सदस्य निशांत सिंधू, अर्जुन शर्मा आणि आबिद मुश्ताक यांच्यामुळे फिरकी आणि अष्टपैलू विभागाला फायदा होईल.

उत्तर विभागीय संघ

कन्हैया वाधवन (कर्णधार), आयुष बडोनी (उपकर्णधार), सनत सांगवान, कामरान इक्बाल, यश धुल, आयुष डोसेजा, अब्दुल समद, निशांत सिंधू, अर्जुन शर्मा, आबिद मुश्ताक, अर्शदीप सिंग, सुनील कुमार, अंशुल कंबोज, युद्धवीर सिंग आणि निखिल कश्यप.

दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय; लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंग निर्दोष, विनेश फोगट संतप्त, म्हणाली…

Web Title: Duleep trophy 2026 north zone squad arshdeep singh kanhaiya wadhawan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • Anshul Kamboj
  • Arshdeep Singh
  • Duleep Trophy
  • duleep trophy 2026
  • north india

संबंधित बातम्या

Duleep Trophy: ‘पहिल्या Inning मध्ये माझ्याबरोबर हेच झालं…’, वैभव सूर्यवंशीने दिले अंपायरला उत्तर, तिलकला टक्कर
1

Duleep Trophy: ‘पहिल्या Inning मध्ये माझ्याबरोबर हेच झालं…’, वैभव सूर्यवंशीने दिले अंपायरला उत्तर, तिलकला टक्कर

जलवा है भाई का! 13 वर्षांनी ईशान किशनने ईस्ट झोनला जिंकवले; Duleep Trophy 2026 वर कोरले नाव
2

जलवा है भाई का! 13 वर्षांनी ईशान किशनने ईस्ट झोनला जिंकवले; Duleep Trophy 2026 वर कोरले नाव

Duleep Trophy 2026: आता सोडणार नाही अन् थांबणार नाही! Ishan Kishan ची शानदार खेळी, ईस्ट झोन थेट…
3

Duleep Trophy 2026: आता सोडणार नाही अन् थांबणार नाही! Ishan Kishan ची शानदार खेळी, ईस्ट झोन थेट…

Duleep Trophy 2026:  याच्यापेक्षा तर कासव बरं! 700 रन्सचा पाठलाग अन् Tilak Verma ची संथ खेळी
4

Duleep Trophy 2026: याच्यापेक्षा तर कासव बरं! 700 रन्सचा पाठलाग अन् Tilak Verma ची संथ खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.