ग्लासगो Commonwealth Games 2026 मध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा; ‘या’ स्थानावर केला मोहीमेचा शानदार शेवट
वाद वाढल्यानंतर, रेस्टॉरंटने एक अधिकृत निवेदन जारी करून बिनशर्त माफी मागितली. व्यवस्थापनाने म्हटले, ‘आम्हाला आमच्या भारतीय वंशाचा आणि वारशाचा अभिमान आहे. सर्वप्रथम, भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल आम्ही बिनशर्त माफी मागतो. हे त्वरित दुरुस्त करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. आम्ही आमच्या लोगोच्या जागी योग्य नकाशा लावू. भारतीय संघाचे यजमानपद भूषवणे हा आमच्यासाठी सन्मान होता. खेळाडू आणि पाहुण्यांनी संध्याकाळचा पुरेपूर आनंद घेतला आणि या आठवणी आमच्यासोबत कायम राहतील.’
माफी मागितल्यानंतर लगेचच, रेस्टॉरंटचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट देखील हटवण्यात आले. हे अकाउंट कायमचे हटवण्यात आले की तात्पुरते निष्क्रिय करण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे.
You’d expect an Indian restaurant to know what India looks like. Apparently not. Even worse, they’ve printed the incorrect version on their hand towels too 🤦♀️ Awkward moment after India’s Commonwealth Games success…At a celebratory dinner in Glasgow, boxer Lovlina Borgohain… pic.twitter.com/MhkKvN9jpI — Nabila Jamal (@nabilajamal_) August 2, 2026
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सात सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह एकूण १० पदके जिंकली. या ऐतिहासिक यशानंतर, संपूर्ण संघ आनंद साजरा करण्यासाठी ग्लासगोमधील ‘मिस्टर सिंग इंडिया, द होम ऑफ करी’ या प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंटमध्ये गेला होतालव्हलिनाच्या लक्षात आले की एका नॅपकिनवर भारताचा नकाशा छापलेला आहे, ज्यामध्ये ईशान्य भारताचे काही भाग दाखवलेले नव्हते. त्यानंतर तिने शांतपणे आणि आदराने आपली चिंता रेस्टॉरंट व्यवस्थापनासमोर मांडली.
लव्हलिना म्हणाली की, ‘कृपया माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू नका. भारताच्या नकाशात आपला ईशान्य भारताचा समावेश नाही हे पाहून मला दुःख झाले आहे. बाहेर लावलेल्या नकाशातही तीच चूक आहे. मी ईशान्य भारतातील आहे आणि यामुळे आम्हाला खूप वेदना होतात. कृपया पुढच्या वेळी याची काळजी घ्या. धन्यवाद.’ हा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होताच अनेक लोकांनी रेस्टॉरंटवर टीका केली आणि योग्य नकाशा वापरण्याची मागणी केली.
लव्हलिनाच्या पाठोपाठ, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (BFI) अध्यक्ष अजय सिंग यांनीही रेस्टॉरंटने वापरलेल्या नकाशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, नॅपकिनवर केवळ ईशान्यच नव्हे, तर जम्मू आणि काश्मीरही अपूर्णपणे दर्शवले आहे. त्यांनी रेस्टॉरंट व्यवस्थापनाला आवाहन केले की, ‘केवळ ईशान्यच नाही, तर काश्मीरचाही त्यात समावेश नाही. चुकीचे नकाशे असलेले सर्व नॅपकिन तात्काळ काढून टाकावेत आणि त्याऐवजी भारताची संपूर्ण भौगोलिक सीमा अचूकपणे दर्शवणारा नकाशा लावावा.’






