Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: आता मैदानात पुन्हा दिसणार नाही ‘47’… Dwayne Bravo ची जर्सी रिटायर; CPL मध्ये पहिल्यांदाच असा सन्मान

Trinbago Knight Riders retire Dwayne Bravo's No. 47 jersey CPL: कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) फ्रँचायझी ट्रिनबागो नाइट रायडर्सने ड्वेन ब्राव्होचा प्रतिष्ठित जर्सी क्रमांक ४७ निवृत्त केला आहे. असा मान मिळवणारा ब्राव्हो हा CPL च्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 30, 2026 | 04:27 PM
Dwayne Bravo's No. 47 jersey

Dwayne Bravo's No. 47 jersey

Follow Us
Follow Us:
  • CPLचा मोठा निर्णय
  • पहिल्यांदाच जर्सी नंबर रिटायर
  • ड्वेन ब्राव्होच्या ‘47’ला मिळाला खास सन्मान

वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक मानला जातो. ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच जगभरातील विविध टी-२० लीगमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) मधील संघ ट्रिनबागो नाइट रायडर्सने ब्राव्होचा प्रसिद्ध जर्सी क्रमांक ४७ रिटायर केला आहे. सीपीएलमधील त्याच्या उत्कृष्ट योगदानासाठी नाइट रायडर्सने हा सन्मान दिला आहे. यासह, ब्राव्हो हा सीपीएलच्या इतिहासात आपला जर्सी क्रमांक रिटायर होणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन

ड्वेन ब्राव्होचा ४७ क्रमांकाचा जर्सी रिटायर

कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) फ्रँचायझी ट्रिनबागो नाइट रायडर्सने रविवार, ३० ऑगस्ट रोजी ड्वेन ब्राव्होचा ४७ क्रमांकाचा जर्सी रिटायर केला. CPL च्या इतिहासात एखाद्या खेळाडूचा जर्सी निवृत्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाइट रायडर्स ग्रुपचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले की, ‘नाइट रायडर्स आणि CPL साठी ड्वेन ब्राव्होचे योगदान खूप मोठे आहे आणि ते शब्दांत किंवा आकड्यांमध्ये मोजता येणार नाही. त्याचा ४७ क्रमांकाचा जर्सी रिटायर करून, संघाला हे सुनिश्चित करायचे आहे की त्याची आठवण आणि ओळख कायमस्वरूपी फ्रँचायझीशी जोडलेली राहील. हा विशेष सन्मान मिळवणारा तो CPL च्या इतिहासातील सर्वात सन्मानित खेळाडू आहे.’

ब्राव्होची शानदार सीपीएल कारकीर्द

४२ वर्षीय ब्राव्हो हा सीपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने खेळाडू म्हणून पाच आणि टीकेआरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून सहावे सीपीएल विजेतेपद पटकावले आहे. आपल्या शानदार सीपीएल कारकिर्दीत, ब्राव्होने १०७ सामन्यांमध्ये १२९ विकेट्स घेतले. तो स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने फलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली असून, १०७ सामन्यांमध्ये १२९ च्या स्ट्राइक रेटने १,१५५ धावा केल्या आहेत.

ड्वेन ब्राव्होची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

ड्वेन ब्राव्होने २०२४ मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. मात्र, निवृत्तीनंतरही ब्राव्हो ट्रिनबागो नाइट रायडर्स फ्रँचायझीशी जोडलेला राहिला आणि त्यांचा मुख्य प्रशिक्षक बनला. ब्राव्होने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४० कसोटी सामन्यात ८६ , १६४ एकदिवसीय सामन्यात १९९ आणि ९१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ७८ विकेट्स घेतले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ५८२ सामने खेळून ६३१ विकेट्स घेतले आहेत.

SL vs UAE: फक्त 7.5 षटके अन् गेम ओव्हर! UAE चा उडवला धुव्वा; श्रीलंकेचा T20I मधील सर्वात मोठा विजय

Web Title: Dwayne bravo no 47 jersey retired trinbago knight riders cpl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Dwayne Bravo
  • West Indies Cricket Team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.