
duleep trophy 2026
मुकेश कुमारने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने पहिल्या डावात 16 ओव्हर गोलंदाजी केली. तसेच त्याने यामध्ये 56 रन्स देत महत्वाच्या 3 विकेट्स पटकावल्या. मात्र यावेळी त्याने संघाला थोडसे निराश देखील केले. 16 ओव्हरमध्ये त्याने 6 नो बॉल आणि एक वाईड बॉल टाकला. दुसऱ्या डावातील गोलंदाजीत देखील मुकेश कुमारने यामध्ये सातत्य ठेवल्याचे दिसून आले. त्याने 44 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. तर एकूण 8 नो बॉल आणि दोन वाईड बॉल टाकले. त्याने एकाच सामन्यात एकूण 14 नो बॉल टाकले. मात्र त्याने दोन्ही डावात एकूण 7 विकेट्स घेतल्या आहेत.
च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
ईस्ट झोनचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार या सामन्यात संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने दोन्ही डावात एकूण 7 विकेट्स घेतल्या आहेत. परंतु, या चमकदार कामगिरीदरम्यान मुकेश कुमारने अनेक नो-बॉल टाकले. त्यामुळे ईस्ट झोनच्या कर्णधाराची निराशा आणि नाराजी स्पष्टपणे मैदानावर दिसून आली.
सामन्यादरम्यान ईस्ट झोनचा नियमित कर्णधार आणि यष्टीरक्षक इशान किशन यष्टीरक्षण करताना मनगटाला दुखापत झाल्यामुळे मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने ईस्ट झोनच्या कप्तानीची धुरा सांभाळली. मुकेश कुमारशिवाय भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आणि अभिजीत सरकार यांनीही दोन्ही पार्यांमध्ये अचूक मारा करत मुकेशला चांगली साथ दिली. सेंट्रल झोनच्या संघात रजत पाटीदार (कर्णधार) आणि रिंकू सिंगसारखे स्टार फलंदाज असूनही ईस्ट झोनच्या धारदार गोलंदाजीसामोर ते मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत.
Cricket News: आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट
ईस्ट झोनने या सामन्यावर मजबूत पकड मिळवली असून मुकेश कुमारच्या या ७ बळींमुळे टीम इंडियाच्या निवडकर्त्यांचे लक्ष पुन्हा एकदा त्याच्याकडे वेधले गेले आहे. मात्र, नो-बॉलची समस्या सुधारणे त्याच्यासाठी पुढील सामन्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे.