
मोहम्मद शमीचे मोठे विधान (फोटो सौजन्य - Instagram)
निवड समितीची उदासीनता आणि आगामी दौऱ्यांमधून त्याला वगळण्यात आल्याबद्दल, मोहम्मद शमीने आत्मविश्वासाने सांगितले, ‘सर, अजूनही आम्ही उत्तम खेळतोय आणि Peak वर आहोत. खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. आम्ही जसे आहोत, तसेच उत्तम खेळत आहोत.’ त्याने पुढे सांगितले की, तो अजूनही सर्वोत्तम गोलंदाजी करत आहे आणि कोणाची निवड होत आहे किंवा नाही यावर नाही, तर जे त्याच्या नियंत्रणात आहे त्यावरच त्याचे लक्ष केंद्रित आहे.
मोहम्मद शमीने भारतासाठी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च २०२५ मध्ये खेळला. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे, परंतु व्हाईट-बॉल फॉरमॅटमधील भारतीय वेगवान गोलंदाजीबद्दलच्या चिंता पाहता, त्याच्या पुनरागमनाची मागणी तीव्र झाली आहे. दरम्यान, त्याचा समकालीन, ३६ वर्षीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जवळपास चार वर्षांनंतर भारतीय संघात परतला आहे. भुवनेश्वरच्या पुनरागमनाचे स्वागत करताना शमी म्हणाला की, त्याचा सध्याचा उत्कृष्ट फॉर्म पाहता, हे पुनरागमन खूप आधीच व्हायला हवे होते.
न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या सर्व फॉरमॅटच्या संघातून वगळल्याबद्दल शमी म्हणाला की, तो निराश नाही. तो म्हणाला, ‘आशा नेहमीच राहिली पाहिजे. कोणत्याही व्यवसायात किंवा खेळात तुमचे एक ध्येय असले पाहिजे. आम्ही आज रणजी ट्रॉफी खेळत आहोत आणि विजेतेपद जिंकण्याचे आमचे ध्येय आहे. माझे ध्येय अगदी स्पष्ट आहे: शक्य तितके जास्त क्रिकेट खेळणे. मी गेल्या देशांतर्गत हंगामातील सर्व सामनेही खेळलो होतो.’
मोहम्मद शमीनेही आपल्या कारकिर्दीतील बंगाल क्रिकेट संघाच्या योगदानाची आठवण काढली आणि सांगितले की, जोपर्यंत तो खेळत राहील, तोपर्यंत तो या संघासाठी आपले १००% योगदान देत राहील. तो भावूक झाला आणि म्हणाला, ‘या संघाने मला माझी ओळख दिली आहे. आज मी जो काही आहे, तो या संघामुळेच आहे. आणि जेव्हा मी माझ्या कारकिर्दीला निरोप देईन, तेव्हा मी याच संघासोबत त्याचा शेवट करेन.’ दरम्यान मोहम्मद शामीला संघात कधी स्थान मिळणार याचीच चाहते वाटत पाहत आहेत.
दहशतीखाली फलंदाज! LSG कोचचा मोठा खुलासा, Mohammed Shami ने शोधली धोकादायक बॉलिंग