Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळाडूंच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या; भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचा आक्रमक पवित्रा

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आज पुण्यातील काँग्रेस भवनला भेट दिली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, विनेश फोगाटची पुण्याला भेट ही काँग्रेससाठी उत्साहवर्धक ठरली.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 18, 2024 | 08:26 PM
खेळाडूंच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या; भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचा आक्रमक पवित्रा

खेळाडूंच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या; भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचा आक्रमक पवित्रा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : हरियाणापेक्षा महाराष्ट्रात जास्त चांगले खेळाडू आहेत. परंतु, त्यांना सरकारकडून प्रोत्साहन मिळत नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देशाचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंना कसल्याही सोईसुविधा हे सरकार देत नाही. खेळाडूंसाठी चांगली मैदानेही नाही. खेळाडूंच्या विकासासाठी खेळाच्या मैदानात आम्हा खेळाडूंना आशीर्वाद देता तसा महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतांमधून आशीर्वाद द्या, असे आवाहन हरियाणातील काँग्रेसच्या आमदार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सोमवारी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार उपस्थित

महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रमेश बागवे, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर, पर्वती विधानसभा मतादरसंघातील उमेदवार अश्विनी कदम, हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दत्ता बहिरट, कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत मोकाटे, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील बापू पठारे आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ विनेश फोगट यांच्या उपस्थितीत खेळाडू मेळाव्याचे काँग्रेस भवन येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विनेश फोगट यांना गदा देऊन सत्कार करण्यात आला.

या मान्यवरांची उपस्थिती

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चवधरी, महिला काँग्रेसच्या प्रभारी शहराध्यक्ष संगीता तिवारी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय शिंदे, रफीक शेख, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद तसेच मेळाव्याचे आयोजक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, शहर काँग्रेसच्या क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे, उपाध्यक्ष लतेंद्र भिंगारे, ओम भवर आदी उपस्थित होते.

मी महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारणात

राजकारणात येईन, असे मला कधी वाटले नव्हते. मी आता राजकारणात असले तरी आधी खेळाडू आहे. आता राजकारणातील जबाबदारी वाढली आहे. मैदानावर संघर्ष केल्यानंतर महिलांच्या शोषणाविरोधात रस्त्यावर संघर्ष करावा लागला. क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना हा त्रास होऊ नये, यासाठी मी संघर्ष करायला तयार आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या तसेच चांगल्या वातावरणात त्यांना आपला खेळ वाढवता यावा यासाठी मी खेळाडूंबरोबर कायम मैदानात उभी असेन. चांगले शिक्षण आणि प्रशिक्षण दिले तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देशात घडतील, अशी भावना फोगट यांनी व्यक्त केली.

भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे दोन पक्ष फोडले. या महायुतीला धडा शिकवण्याती वेळ आली आहे. मतदानात मोठी ताकद असते. ही ताकद महायुतीला दाखविण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी केली.

उज्ज्व भविष्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन

उज्ज्वल भविष्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा,असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडी सरकार येताच प्रत्येक शहरात चांगली मैदाने बांधण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. विनेश फोगट यांच्याशी संवाद साधण्यासाठी खेळाडूंची या मेळाव्याला उपस्थिती होती. विविध पदक विजेत्या दिग्गज आणि ज्येष्ठ खेळाडूंपासून लहान मुलांची यावेळी गर्दी झाली होती.

पॅरिस ऑलिम्पिक अंतिम फेरीत ठरली होती अपात्र
उपांत्य फेरीत विनेश फोगटने क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला. तिच्या श्रेणीतील पहिल्या सामन्यात तिचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि जागतिक विजेता जपानच्या युई सुसाकीशी झाला. विनेशने सुसाकीचा 3-2 असा पराभव केला होता. त्यानंतर तिने इतिहास रचत अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, आता सर्वांच्या पदरी निराशा आली आहे. विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले होते. नियमांनुसार, कोणत्याही कुस्तीपटूला कोणत्याही श्रेणीमध्ये केवळ 100 ग्रॅम जास्त वजन भत्ता दिला जातो, परंतु विनेशचे वजन यापेक्षा जास्त होते, त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले आहे.

Web Title: Elect mahavikas aghadi for player advancement aggressive stance of indias star wrestler vinesh phogat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 08:25 PM

Topics:  

  • india
  • Mahavikas Aghadi
  • Paris Olympic 2024
  • pune news
  • Vinesh phogat

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
3

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.