
भारताने टॉस जिंकून घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय
कर्णधार हॅरी ब्रूकने केले शानदार अर्धशतक
जोस बटलर अन् ब्रूकची शानदार भागीदारी
India Vs England 5th T20 Live Updates: सध्या भारत अन् इंग्लंडविरुद्ध शेवटचा म्हणजेच टी 20 सिरिजमधला 5 वा सामना सुरू आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघ ट्रॅफिकमध्ये अडकल्याने टॉस होण्यास विलंब झाला. श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने कर्णधार हॅरी ब्रूक अन् जोस बटलरच्या खेळीच्या जोरावर भारताला रन्सचे टार्गेट दिले आहे. जोस बटलरने शानदार शतक ठोकले आहे. सामना जिंकून शेवट गोड करण्यासाठी भारताला 258 रन्सची गरज असणार आहे.
इंग्लंडची फलंदाजी
भारताने इंग्लंडच्या संघाला शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र इंग्लंडच्या संघाने शानदार सुरुवात केली. फिलीप सॉल्ट आणि कर्णधार हॅरी ब्रूकने इंग्लंडची सुरुवात केली. मात्र फिलिप सॉल्ट 6 रन्स करून आउट झाला. मात्र त्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार हॅरी ब्रूकने इंग्लंडसाठी मोठी भागीदारी रचली. हॅरी ब्रूकने शानदार अर्धशतकी खेळी केली. तर जोस बटलरने देखील अर्धशतक लगावले. या दोन्ही फलंदाजांनी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोन्ही फलंदाजांनी 200 पेक्षा अधिक रन्सची अभेद्य भागीदारी रचली. जोस बटलरने खणखणीत शतक ठोकले आहे. जोस बटलरने 131 रन्सची आक्रमक खेळी केली.
Our skipper on 🔥 A 19-ball fifty! 😳@IGCom 🤝 pic.twitter.com/APeSId0Bs2 — England Cricket (@englandcricket) July 11, 2026
भारताची गोलंदाजी
भारतीय संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. प्रसिद्ध कृष्णाने भारताला फिलिप सॉल्टच्या रूपात पहिली विकेट मिळवून दिली. मात्र त्यानंतर प्रिन्स यादव, सुयश शेडगेम अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगला इंग्लंडची बटलर-ब्रूकची जोडी फोडण्यात यश आले नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारताकडून काही प्रमाणात ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. अखेर 19 व्या ओव्हरमध्ये शिवम दुबेने जोस बटलरला आउट केले.
IND Vs ENG Live: श्रेयस अय्यरसमोर अडचणींचा डोंगर असतानाच टॉसला विलंब; मात्र कारण काय?
भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा/संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.
इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, हॅरी ब्रुक (कर्णधार), टॉम बँटन, विल जॅक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, जोश टंग, आदिल रशीद, रेहान अहमद.