India vs england live streaming (फोटो- सोशल मिडिया)
टी 20 वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवचा आयपीएलमधला खराब फॉर्म पाहून त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. श्रेयस अय्यरवर टी 20 संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. मात्र त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग 5 टी 20 सामने गमावले आहेत. इतिहासात प्रथमच आयर्लंडने भारताचा पराभव केल्याचे पाहायला मिळाले.
त्यानंतर इंग्लंडच्या संघाने देखील भारताविरुद्धची टी 20 मालिका जिंकली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने सलग 5 सामने गमावल्याने आता मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बीसीसीआयने देखील याची गंभीर दखल घेतली आहे.
वैभव सूर्यवंशी देखील या सिरिजमध्ये चांगली खेळी करू शकलेला नाहीये. तीनही सामन्यात 15 ते 20 रन्सच्या मध्येच आउट झाल्याचे दिसून येत आहे. अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र अन्य फलंदाज मोठी खेळी करण्यास अपयशी ठरले आहेत. गोलंदाजीत देखील भारताला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये.
कर्णधार श्रेयस अय्यरची मागील सामन्यातील खेळी व्यर्थ गेली होती. उपकर्णधार तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन सपशेल अपयशी ठरताना दिसून येत आहेत. तर गोलंदाजीत देखील भारतीय क्रिकेट संघ कमी पडताना दिसून येत आहे. त्यामुळे सातत्याने संघात केले जाणार बदल यामुळे भारताला नुकसान होत असल्याचे म्हटले जात आहे.
भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा/संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.
इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, हॅरी ब्रुक (कर्णधार), टॉम बँटन, विल जॅक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, जोश टंग, आदिल रशीद, रेहान अहमद.






