Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC point Table मध्ये इंग्लंडची स्थिती भारतापेक्षा वाईट, ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम! जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर, WTC पॉइंट्स टेबल अपडेट करण्यात आले आहे ज्यामध्ये गतविजेता दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 21, 2025 | 11:33 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयासह, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व अबाधित आहे. ऑस्ट्रेलियाने सध्याच्या WTC मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि सर्व सामने जिंकून, संघ १०० टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, पराभवाची हॅटट्रिक झेलणाऱ्या इंग्लंड संघाची स्थिती भारतापेक्षाही वाईट आहे. इंग्लंडचा विजयाचा टक्का आता ३० पेक्षा कमी झाला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर, WTC पॉइंट्स टेबल अपडेट करण्यात आले आहे ज्यामध्ये गतविजेता दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात २-० ने मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे ७५% गुण आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका व्यतिरिक्त, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पाकिस्तान हे देश टॉप-५ मध्ये आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया टॉप ५ मधून बाहेर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून व्हाईटवॉश झाल्यानंतर टीम इंडियाची अवस्था वाईट आहे.

T20 World Cup 2025 Team India Squad : घरी जा, नजर काढा…भारतीय संघामधून वगळल्यानंतर सुनील गावस्कर यांनी शुभमन गिलला दिला सल्ला

WTC पॉइंट्स टेबलमध्ये इंग्लंडची परिस्थिती भारतापेक्षाही वाईट आहे. इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या आठ कसोटींपैकी फक्त दोनच कसोटी जिंकल्या आहेत, तर पाच गमावल्या आहेत. भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडल्यानंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेत ते ०-३ ने पिछाडीवर आहेत.

Australia continue their reign at the top of the #WTC27 standings following a stellar win in Adelaide 🏏 More from the latest #AUSvENG Test 👉 https://t.co/Zwi3UpkPtp pic.twitter.com/wSCgS7yQtb — ICC (@ICC) December 21, 2025

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अ‍ॅलेक्स कॅरीच्या शतकाच्या जोरावर ३७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड २८६ धावांवर सर्वबाद झाले आणि यजमान संघाला ८५ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात, ट्रॅव्हिस हेडने कॅरीसह इंग्लंडला धुव्वा उडवून त्याच्या कारकिर्दीतील ११ वे शतक ठोकले. हेडने जेव्हा जेव्हा शतक ठोकले आहे तेव्हा ऑस्ट्रेलियाला फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ३४९ धावा केल्या आणि ४३५ धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना संपूर्ण इंग्लंड संघ ३५२ धावांवर सर्वबाद झाला.

 

Web Title: England position worse than india in wtc point table australia dominance continues know the position of the points table

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 11:33 AM

Topics:  

  • Australia vs England
  • cricket
  • Sports
  • WTC Point Table

संबंधित बातम्या

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
1

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
2

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
3

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.