
भारत अन् इंग्लंड यांच्यातील वनडे सिरिज 14 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यधि एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नितीश कुमार रेड्डी हा खेळाडू भारतीय संघातून बाहेर गेला आहे. दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी संघाबहेर गेला आहे. त्याच्या जागेवर आता वनडे सिरिजमध्ये शिवम दुबे खेळताना दिसणार आहे.
शिवम दुबे सध्या भारतीय टी 20 संघाचा हिस्सा आहे. त्यामुळे त्याला वनडे सिरिज खेळताना तेथील वतावर्णशी जुळवून घेणे सोयीचे जाऊ शकते. नितीश कुमार रेड्डी सध्या दुखापतीमधून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे तो खेळण्यासाठी उपलब्ध नसेल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
नितीश कुमार रेड्डीला अफगणिस्तानविरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. त्या दुखापतीमधून तो अद्याप सावरला नाहीये. नितीश कुमार रेड्डी वनडे सिरिजमध्ये खेळू शकणार नाहीये. त्यामुळे आता संघात शिवम दुबेची एंट्री झाली आहे. शिवम दुबेने 2019 मध्ये आपला पहिला वनडे सामना खेळला होता. वनडे फॉर्मटमध्ये त्याला जास्त संधी मिळाली नव्हती. त्याने एकूण 4 सामने खेळले असून त्याने त्यामध्ये 43 रन्स केले आहेत.
14 जुलै रोज भारत अन् इंग्लंड यांच्यातील पहिला सामना होणार आहे. हा सामना बर्मिंगहम स्टेडियमवर होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर या खेळाडूंचा समावेश असणार आहे. त्यामुळे आता नितीश कुमार रेड्डी ऐवजी शिवम दुबे खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. विराट कोहली अनेक दिवसांनी भारतीय संघातून वनडे सिरिज खेळताना दिसणार आहे.