Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC Points Table: इंग्लंडच्या विजयाने WTC गुणतालिकेत मोठा बदल, न्यूझीलंडला धक्का; भारत कितव्या स्थानी?

ENG vs New Zealand Loss affected WTC Points Table 2026-27: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर ११५ धावांनी मात केली. ज्यामुळे आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 07, 2026 | 07:10 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • लॉर्ड्सवर इंग्लंडचा दबदबा
  • न्यूझीलंडची शरणागती
  • WTC गुणतालिकेत मोठा फटका
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिकेला ४ जूनपासून सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला गेला. ४ जून रोजी सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा ११५ धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर चौथ्या डावात २५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु किवी संघ त्यांच्या दुसऱ्या डावात केवळ १३८ धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फेरबदल झाला आहे. या विजयामुळे इंग्लंडला फारसा फायदा झाला नसला तरी, न्यूझीलंडने दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली आहे.

Vaibhav Sooryavanshi: ‘मला फक्त खेळायचं नाही तर 10-20 वर्षे…’.; वैभवने सांगितला भविष्याचा प्लॅन

लॉर्ड्सवर इंग्लंडचा दबदबा

या सामन्यात, लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या फलंदाजांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वेगवान गोलंदाजांनी सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी घरच्या मैदानातील परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला आणि न्यूझीलंडच्या मजबूत फलंदाजीला टिकण्याची कोणतीही संधी दिली नाही. या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडला केवळ १४० धावाच करता आल्या. परंतु, इंग्लंडच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला ११३ धावांवर रोखले आणि संघाला कमबॅक करण्यास मदत केली.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात प्रभावी फलंदाजी पाहायला मिळाली. संघाने २२६ धावा केल्या, ज्यात एमिलिओ गेच्या महत्त्वपूर्ण ५७ धावांचे योगदान होते. जेमी स्मिथनेही ३९ धावांचे योगदान दिले. ऑली रॉबिन्सनच्या २९ धावांनी संघाला ही धावसंख्या गाठण्यास मदत केली. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर २५३ धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु, न्यूझीलंडचा संघ चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच पक्त १३८ धावांवर सर्वबाद झाला आणि इंग्लंडने हा सामना ११५ धावांनी जिंकला.

WTC  गुणतालिकेत किवी संघाला मोठा फटका

या सामन्यापूर्वी, न्यूझीलंड आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून मजबूत स्थितीत होते. मात्र, लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडकडून झालेल्या या दारुण पराभवानंतर, किवी संघाला गुणतालिकेत मोठा धक्का बसला असून ते थेट चौथ्या स्थानावर घसरले आहेत. न्यूझीलंड संघ ४ सामन्यात २ विजय, एक पराभव आणि एका ड्रॉसह ५८.३३ गुणावर आहेत. दुसरीकडे, इंग्लंड संघ मालिकेच्या सुरुवातीपूर्वी सातव्या स्थानी होता आणि विजयानंतरही तो त्याच स्थानावर कायम आहे. दरम्यान, किवींच्या पराभवाचा फायदा दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांना झाला असून, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, तर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

भारतीय संघ सहाव्या क्रमांकावर

डब्ल्यूटीसी २०२५-२७ गुणतालिकेतील बांगलादेश ५८.३३ टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर भारत ४८.१५ टक्के गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान चार सामने खेळून केवळ ८.३३ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज ४.१७ टक्के गुणांसह तळाशी आहे, त्यांनी या फेरीत आठ सामने खेळूनही एकही सामना जिंकलेला नाही.

IND vs AFG Test : दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा; पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचा जलवा, अफगाणिस्तान अडचणीत

Web Title: England vs new zealand lords test 2026 english victory impact wtc 206 27 points table india on 6th position

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • ENG vs NZ
  • IND Vs ENG
  • Lord's Cricket Ground

संबंधित बातम्या

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन
1

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral
2

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?
3

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड
4

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.