KKR विरुद्ध SRH : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा आज अंतिम सामना रंगणार आहे. आजचा हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळावला जाणार आहे. आजच्या या सामन्यांमध्ये सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. कोलकाता विरुद्ध हैदराबाद हा सामना चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. केकेआरने क्वालिफायर-1 मध्ये हैदराबादचा पराभव केला होता. त्याचवेळी हैदराबादने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली, एसआरएचने या हंगामात चमकदार कामगिरी केली. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी 277 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने आरसीबीविरुद्ध 287 धावा करत त्याचाच विक्रम मोडला. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन सारखे प्रमुख खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. केकेआरने हैदराबाद, बेंगळुरू आणि दिल्लीविरुद्ध सलग तीन विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. सुनील नारायण आणि फिल सॉल्टने संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. त्याचबरोबर गोलंदाजांनीही सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत केकेआर संतुलित संघ दिसला आहे. आजच्या फायनलमध्ये कोणते प्रमुख खेळाडू कामगिरी करतील याकडे एकदा नजर टाकूया.
पॅट कमिन्स
यंदाच्या सीझनमध्ये पॅट कमिन्सने आपल्या शानदार कर्णधारपदाने सर्वांना चकित केले आहे. त्याने क्वालिफायर-2 मध्ये फिरकीपटूंसोबत गोलंदाजी करून सर्वांना थक्क केले. आतापर्यंत कमिन्सने संपूर्ण सीझनमध्ये फिरकीपटूंपेक्षा कमी गोलंदाजी केली होती. फायनलमध्ये पुन्हा एकदा असेच काहीतरी करायला त्याला आवडेल.
[read_also content=”कोलकाता विरुद्ध हैदराबादचा महामुकाबला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार मोफत Online Streaming https://www.navarashtra.com/sports/kolkata-knight-riders-vs-sunrisers-hyderabad-grand-match-know-when-and-where-to-watch-free-online-streaming-538443.html”]
सुनील नरेन
सुनील नरेन केकेआरसाठी बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याची स्फोटक सलामीची फलंदाजी आणि किफायतशीर फिरकी गोलंदाजीमुळे तो केकेआरसाठी महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. अंतिम फेरीत त्याची भूमिका महत्त्वाची असेल.
अभिषेक शर्मा
या युवा फलंदाजाने आपल्या पॉवर हिटिंगने सर्वांना प्रभावित केले आहे आणि चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या मोसमात सनरायझर्ससाठी अनेक उपयुक्त खेळी खेळल्या आहेत. KKR विरुद्ध क्वालिफायर-1 आणि राजस्थान विरुद्ध क्वालिफायर-2 मध्ये त्याची बॅट शांत राहिली. मात्र, त्याने चेंडूने चमत्कार केला. अभिषेकला फायनलमध्ये धमाका करायचा आहे.
[read_also content=”हार्दिक पांड्याचं ट्रम्प कार्ड, असं झालं तर नताशाला संपत्ती मिळणार नाही… https://www.navarashtra.com/sports/hardik-pandya-natasa-stankovic-divorce-ipl-2024-trolling-538498.html”]
व्यंकटेश अय्यर
केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. क्वालिफायर-1 मध्ये हैदराबादविरुद्ध अर्धशतकी खेळी खेळली. श्रेयस अय्यरच्या साथीने त्याने संघाला विजयापर्यंत नेले. अंतिम फेरीदरम्यान त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.
ट्रॅव्हिस हेड
ट्रॅव्हिस हेड या सीझनमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक ठरला आहे. त्याने 37 चेंडूत शतकही ठोकले आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी त्याने पाच अर्धशतकेही झळकावली आहेत. क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 मध्ये त्याची बॅट शांत राहिली आहे. मात्र, त्याला अंतिम फेरीत धडक मारायची आहे.