Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup Final ची जबरदस्त क्रेझ!अर्जेंटिना-स्पेन सामन्याच्या तिकिटांसाठी लाखोंची बोली; किंमत ऐकून थक्क व्हाल

FIFA World Cup 2026 Final Ticket Price: फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात अर्जेटिना आणि स्पेन भिडणार आहेत. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. कारण तिकिटांसाठी फॅन्स लाखो रुपये मोजत आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 18, 2026 | 02:38 PM
FIFA World Cup Final ची जबरदस्त क्रेझ!अर्जेंटिना-स्पेन सामन्याच्या तिकिटांसाठी लाखोंची बोली; किंमत ऐकून थक्क व्हाल
Follow Us
Follow Us:
  • FIFA World Cup Final ची क्रेझ
  • अर्जेंटिना-स्पेन सामन्याच्या तिकिटांसाठी लाखोंची मोजणी
  • तिकीट विक्रीचे सर्व विक्रम मोडले
फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेचा ( FIFA World Cup 2026 )अंतिम सामना २० जुलै रोजी खेळला जाणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यात गतविजेता अर्जेटिना आणि स्पेन आमनेसामने येणार आहे. न्यू जर्सीमधील ईस्ट रदरफोर्ड येथील मेटलाइफ स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२:३० वाजता महामुकाबल्याला सुरूवात होईल. हा विश्वचषक लिओनल मेस्सीचा शेवटचा विश्वचषक असू शकतो. त्यामुळे फुटबॉलचा हा भव्य सोहळा स्टेडियममध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. परंतु, सामन्याआधी तिकिटांच्या दरांनी सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. एका तिकिटासाठी चाहते चक्क लाखो रुपये मोजत आहेत.

PV Sindhu ची विजयी गर्जना; चेन यूफेईला नमवत Japan Open 2026 च्या फायनलमध्ये धडक

तिकीट विक्रीचे सर्व विक्रम मोडले

टिकपिक या तिकीट पुनर्विक्री बाजारपेठेतील ताज्या आकडेवारीनुसार, चाहते या भव्य सामन्यासाठी मोठी रक्कम मोजत आहेत, ज्यामुळे हा अमेरिकन क्रीडा इतिहासातील सर्वात महागडा कार्यक्रम ठरला आहे. टिकपिकच्या मते, हा ऐतिहासिक अंतिम सामना पाहण्यासाठी खरेदीदारांनी प्रति तिकीट सरासरी ११, ३२७ डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनेनुसार, अंदाजे १० लाख रुपये मोजले आहेत. अमेरिकन क्रीडा इतिहासातील कोणत्याही क्रीडा कार्यक्रमासाठी नोंदवलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक जास्त खरेदी किंमत आहे. या फुटबॉल सामन्याने अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय क्रीडा स्पर्धा ‘सुपर बाउल LVIII’ चा विक्रमही मागे टाकला आहे, जिथे तिकिटांची सरासरी किंमत ९,४११ (सुमारे ९ लाख रुपये) नोंदवली गेली होती.

या सामन्यातील सर्वात स्वस्त तिकिटांची अंदाजे किंमत देखील भुवया उंचावतील. टिकपिटच्या अनुसार, १७ जुलै पर्यंत सर्वात स्वस्त तिकिटांची अंदाजे किमत ७, ६६७ डॉलर्स इतकी होती. किंमत जास्त असूनही तिकिटांच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. जगभरातील फुटबॉल चाहते हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी मेटलाइफ स्टेडियममध्ये पोहोचण्यास उत्सुक आहेत, जिथे एकीकडे स्पेनला आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे, तर दुसरीकडे मेस्सीला सलग दुसरे विश्वचषक विजेतेपद जिंकून आपल्या सुवर्ण कारकिर्दीचा आणखी एक संस्मरणीय शेवट करायचा आहे.

फिफाने मोडला क्रिडा विश्वातील सर्वात मोठा विक्रम

  • २०२६ विश्वचषक अंतिम सामना (स्पेन विरुद्ध अर्जेंटिना): ११,३२७ डॉलर्स
  • २०२४ सुपर बाउल ५८ (कॅन्सस सिटी चीफ्स विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को ४९र्स): ९,४११डॉलर्स
  • २०२१ सुपर बाउल ५५ (टँपा बे बकॅनियर्स विरुद्ध कॅन्सस सिटी चीफ्स): ७,३१३ डॉलर्स
  • २०२० सुपर बाउल ५४ (कॅन्सस सिटी चीफ्स विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को ४९र्स): ६,५४६ डॉलर्स
  • २०२६ एनबीए फायनल्स गेम ३ (न्यूयॉर्क निक्स विरुद्ध सॅन अँटोनियो स्पर्स): ६,३०८ डॉलर्स
Cricket News: इंग्लंड दौरा संपताच टीम इंडियाला नवे आव्हान; वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर

Web Title: Fifa world cup 2026 final argentina vs spain highest ticket price broke all records

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • FIFA World Cup Final
  • Football Tournament
  • Lionel Messi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.