Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Loyola Football Cup 2026 मध्ये गोल्सचा धडाका अन्…; ‘या’ चार संघांचा दणदणीत विजय

Football: १६ वर्षांखालील गटात जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूलने अफलातून पुनरागमन करत इन्फंट जीझस स्कूलचा ८-२ असा धुव्वा उडवला. इन्फंट जीझसच्या शार्दूल करंडेने दुसऱ्या आणि दहाव्या मिनिटाला गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 13, 2026 | 03:31 PM
Loyola Football Cup 2026

Loyola Football Cup 2026

Follow Us
Follow Us:
  • बिशप्स, लोयोला, जे. एन. पेटिट यांचे दणदणीत विजय
  • कौस्तुभ पंचारे, दानिश गोनाल यांची हॅट्ट्रिक
  • सेंट व्हिन्सेंट्स, विद्या भवनचीही उपांत्य फेरीत धडक
पुणे/Football: बिशप्स को-एड स्कूल (उंड्री), लोयोला हायस्कूल आणि जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूल यांनी प्रतिस्पर्ध्यांवर गोलांचा वर्षाव करत लोयोला फुटबॉल चषक २०२६ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल आणि विद्या भवन हायस्कूल यांनीही आपापल्या लढती जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

लोयोला हायस्कूल, पाषाण येथील मैदानावर सोमवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत बिशप्सच्या कौस्तुभ पंचारे आणि जे. एन. पेटिटच्या दानिश गोनाल यांनी हॅट्ट्रिक नोंदवत दिवस गाजवला.

कल्याणी स्कूलचा ७-१ असा धुव्वा

१४ वर्षांखालील गटात बिशप्स को-एड स्कूल, उंड्री संघाने द कल्याणी स्कूलचा ७-१ असा धुव्वा उडवला. कौस्तुभ पंचारेने (३५, ४०, ४५ मि.) हॅट्ट्रिक नोंदवत विजयात सिंहाचा वाटा उचलला. जेडन डेव्हिडने (३५, ४७ मि.) दोन गोल केले, तर सालिफ बेग (८ मि.) आणि श्रेयान सिंग (३४ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. कल्याणी स्कूलकडून अक्षज अगरवालने (४२ मि.) एकमेव गोल केला.

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत

लोयोलाचाही एकतर्फी विजय

याच गटातील अन्य लढतीत लोयोला हायस्कूलने जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूलचा ६-१ असा फडशा पाडला. विशेष म्हणजे, अगस्त्य बर्डेने सातव्याच मिनिटाला गोल करून पेटिटला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यानंतर लोयोलाने सलग सहा गोल करत सामन्याचे चित्रच पालटले. शॉन आंग्रे (१६, १८ मि.) आणि निवेद नायर (३६, ४१ मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. आरव इंगळे (८ मि.) आणि शार्दूल मनोहर (४५ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.

सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलनेही दमदार खेळ करत सेंट झेवियर्स हायस्कूलवर ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. रयान पंजाबीने (११, ४९ मि.) दोन गोल झळकावले, तर अन्विक लोबोने (४७ मि.) एक गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

दोन गोलांनी पिछाडीवरून पेटिटचे आठ गोल!
१६ वर्षांखालील गटात जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूलने अफलातून पुनरागमन करत इन्फंट जीझस स्कूलचा ८-२ असा धुव्वा उडवला. इन्फंट जीझसच्या शार्दूल करंडेने दुसऱ्या आणि दहाव्या मिनिटाला गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यानंतर पेटिटच्या खेळाडूंनी सलग आठ गोलांचा धडाका लावत प्रतिस्पर्ध्याला निष्प्रभ केले.

Lionel Messi: पाणावलेले डोळे, पेनल्टी गोल अन्…लिओनेल मेस्सीचा शेवटचा सामना प्रचंड भावूक; एका युगाचा अंत

दानिश गोनालने (३०, ४७, ५० मि.) हॅट्ट्रिक साधली, तर ध्रुव पुजारीने (१३, २२ मि.) दोन गोल केले. तन्विश खैरनार (२५ मि.), युग चौहान (४६ मि.) आणि ऋग्वेद घुले (४८ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाचा दणदणीत विजय साकारला. याच गटातील चुरशीच्या लढतीत विद्या भवन हायस्कूलने ब्ल्यू रिज पब्लिक स्कूलवर १-० अशी निसटती मात केली. जोनाथन साळवेने ३८व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. लोयोला स्कूल आणि एक्स-लोयोला अल्युमनी नेटवर्क (ELAN) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला टाटा ऑटोकॉमचे प्रायोजकत्व लाभले आहे.

Web Title: Loyola football cup 2026 bishops loyola j n petit enter semifinals pune sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Football
  • Football Tournament
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
1

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Cricket: अनुष्का वाईकरची अष्टपैलू कामगिरी; डिलीजंट क्रिकेट क्लबने स्पर्धेत उघडले विजयाचे खाते!
2

Cricket: अनुष्का वाईकरची अष्टपैलू कामगिरी; डिलीजंट क्रिकेट क्लबने स्पर्धेत उघडले विजयाचे खाते!

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…
3

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
4

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.