भारतीय संघाचा इंग्लंड दौरा अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरलेला नाही. टीम इंडियाला सर्वप्रथम, ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला आणि एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकूनही भारताला दुसरा सामना गमवावा लागला. दरम्यान, मालिकेतील अंतिम सामना १९ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाईल. यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जाईल.
वेस्ट इंडिज संघ सप्टेंबरमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे. मालिकेतील पहिला सामना २७ सप्टेंबर रोजी, दुसरा सामना ३० सप्टेंबर रोजी, तर तिसरा आणि अंतिम सामना ३ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. याचा अर्थ या दोन मालिकांमध्ये बराच वेळ आहे. हे सामने पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी म्हणूनही पाहिले जात आहे. मात्र, या मालिकेनंतर लगेचच भारतीय संघ तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे, ज्यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे तीन देश २०२७ चा एकदिवसीय विश्वचषकाचे सह- आयोजन करतील. ऑक्टोबर ते नोव्हेंबर ही स्पर्धा खेळवली जाणार असल्याचे वृत्त आहे. आयसीसीने अद्याप वेळापत्रक जाहीर केले नसले तरी, स्पर्धेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे. २०२७ चा विश्वचषक हा पहिल्या विश्वचषकापेक्षा पूर्पपणे वेगळा असणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यापासूनच स्पर्धा रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.






