Finally, Prithvi Shaw is gone from Mumbai! He will play for 'this' team along with Rituraj Gaikwad.
Prithvi Shaw now joins Maharashtra Cricket Association : भारतीय फलंदाज आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू पृथ्वी शॉने अखेर मुंबई संघाला रामराम ठोकला आहे. पृथ्वी शॉ आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सामील झाला असून तो आता येत्या हंगामात महाराष्ट्राकडून खेळताना दिसणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून याची घोषणा करण्यात आली आहे.
पृथ्वी शॉ गेल्या काही काळापासून मुंबई संघावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे.तो योग्य संधी मिळण्याची वाट बघत होता. त्यानंतर शॉकडून दुसऱ्या राज्यातून खेळण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे एनओसीची मागणी केली होती. शॉने गेल्या महिन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते, जे त्याच्या गव्हर्निंग कौन्सिलने मंजूर करण्यात आले होते. खराब फिटनेस आणि शिस्तीमुळे शॉला मुंबईच्या रणजी संघातून डच्चू देण्यात आला होता. त्याने मुंबईसाठी मध्य प्रदेशविरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शेवटचा सामना खेळला होता. अंतिम सामन्यात मुंबईने बाजी मारली होती.
हेही वाचा : Zim vs SA : क्रिकेट विश्वात तहलका! दक्षिण आफ्रिकेच्या Wian Mulder चे विश्वविक्रमी त्रिशतक
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि भारतीय संघातील आक्रमक टॉप ऑर्डर फलंदाज पृथ्वी शॉ अधिकृतपणे मुंबई क्रिकेट असोसिएशनपासून वेगळे झाला असून येत्या देशांतर्गत हंगामात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा धोरणात्मक बदल भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक महत्त्वाचा विकास म्हणून पाहिला जात आहे, जो महाराष्ट्र संघाला अधिक मजबूत बनवेल.
त्यात पुढे म्हटले आहे की, पृथ्वी शॉने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असुन त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीने आणि सामना जिंकण्याच्या क्षमतेने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने आयपीएल तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील हे केले आहे.
महाराष्ट्र संघात सामील झाल्यानंतर पृथ्वी शॉने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर महाराष्ट्र संघात सामील झाल्यामुळे मला क्रिकेटर म्हणून पुढे जाण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी असेल.”
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, “शॉच्या सामील होण्यामुळे ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, मुकेश चौधरी आणि रजनीश गुरबानी यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या आधीच प्रतिभावान संघाला अधिक बळकटी मिळणार आहे. शॉचा आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलचा अनुभव अमूल्य असानर आहे. विशेषतः संघातील तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी.”